Mira Road Murder Case

Mira Road Murder Case : विकृतीचा कळस ! मीरा रोड मर्डर केसमध्ये धक्कादायक खुलासा

708 0

ठाणे : मीरारोडच्या सरस्वती वैद्य हत्याकांडाने (Mira Road Murder Case) संपूर्ण देशाला हादरवून टाकले होते. या प्रकरणात (Mira Road Murder Case) आता नव नव्या अपडेट समोर येत आहेत. अशातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.

मीरा रोड हत्याकांडात मनोज सानेने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घेतला होता ‘या’ गोष्टीचा आधार

धक्कादायक माहिती समोर
आरोपी मनोज साने (Manoj Sane) यांने सरस्वतीचे तुकडे करण्याआधी तिच्या विवस्त्र मृतदेहासोबत स्वतः नग्न होऊन सेल्फी काढले. नंतर त्याने पॉर्न व्हिडिओ पाहिले असल्याचे पोलीस तपासात उघड झालं आहे. साने याने सरस्वतीपासून लैंगिक आजाराची माहिती लपवली होती, असेदेखील समोर आले आहे. पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यानुसार, मनोज साने याचे इतर महिलांशी संबंध होते. सानेने आपल्या जबाबात तो एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचे देखील सांगितले.

मीरारोड हत्या प्रकरणात आरोपीने केला ‘हा’ मोठा खुलासा; म्हणाला ती माझ्या मुलीसारखी…

काय आहे नेमके प्रकरण?
मिरारोडच्या गीतानगरमध्ये राहणाऱ्या आरोपी मनोज साने याने लिव्ह इन पार्टनर सरस्वतीची निर्घृणपणे हत्या केली होती. यानंतर आरोपीने सरस्वतीची हत्या (Mira Road Murder Case)केल्यानंतर तिच्या शरीराचे तुकडे केले. ते तुकडे प्रेशर कुकरमध्ये शिजवले आणि फेकून देऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कलम 302 अंतर्गत हत्येचा आणि 201 अंतर्गत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. हत्या करण्यापूर्वी मनोज सानेने बोरीवलीच्या आदर्श स्टोअर्स या नर्सरीच्या दुकानातून कीटकनाशक खरेदी केल्याची माहिती समोर आली आहे. सोमवारी दुपारी पोलिसांनी आरोपी सानेला बोरीवलीच्या बाभई येथील एका नर्सरीच्या दुकानात नेलं होतं. तिथे केलेल्या चौकशीत साने यानेच किटकनाशक खरेदी केल्याचं उघड झाले होते.

Share This News

Related Post

VIDEO : मुलुंड पूर्व परिसरात इमारतीतील घराचा स्लॅब कोसळून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू; इतर कुटुंबांना अन्यत्र हलवलं…

Posted by - August 16, 2022 0
मुलुंड : मुलुंड पूर्वेकडील नाणेपाडा परिसरातल्या एका इमारतीच्या घरातील स्लॅब कोसळून वृद्ध दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सोमवारी रात्री…

तुम्हाला माहित आहे का ? मकर संक्रांतीला काळे कपडे घालण्यामागे ‘हे’ आहे कारण

Posted by - January 14, 2023 0
हिंदू सणासुदीला सामान्यपणे काळ्या रंगाचे कपडे वापरले जात नाहीत. कारण काळा रंग अशुभं असल्याचं मानलं जातं. मात्र हाच काळा रंग…

शरद पवार यांनी नकार दिल्यास राष्ट्रपतीपदासाठी राजकीय परिघाबाहेरील उमेदवार निवडावा, शिवसेनेची भूमिका

Posted by - June 15, 2022 0
नवी दिल्ली- केंद्रातील सत्ताधारी भाजपाने लोकशाहीची मूल्ये पायदळी तुडवली असून सर्व विरोधकांनी राष्ट्रपतीपदासाठी सक्षम उमेदवार ठरवावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद…

HEALTH WEALTH : मुळव्याधीने त्रस्त आहात? ही पथ्य अवश्य पाळा; नक्की मिळेल आराम

Posted by - October 25, 2022 0
मुळव्याध हा उष्णतेने होणारा आजार आहे. खरं तर हा सामान्य आजार आहे. परंतु काही जणांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन…

संजय बियाणी यांची अंतयात्रा रोखली, आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी

Posted by - April 6, 2022 0
नांदेड- शहरातील प्रसिद्ध बिल्डर संजय बियाणी यांच्या हत्येप्रकरणी दोषींना तत्काळ अटक व्हावी, अशी मागणी करत संतप्त नागरिकांनी बियाणी यांची अंत्ययात्रा…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *