सोशल मीडियावर चॅटिंग करत मुलींचे अश्लील व्हिडिओ बनवून केले व्हायरल; पुण्यातील तरुणाला अखेर मुंबईतून केली अटक
मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवून व्हायरल केल्याप्रकरणी पुण्यातील एका तरुणाला मुंबईतील चेंबूर येथून अटक करण्यात आली आहे. अनेक दिवस पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या या आरोपीला पकडण्यात अखेर यश आला असून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर आरोपी हा एका मुलीला सोशल मीडियावर मेसेज करत होता. काही दिवसांनी त्याने वेगवेगळ्या अकाउंट वरून त्याच मुलीशी चॅटिंग केली. या चॅटिंग वेळी तू अनेकदा मुलीला कॉल आणि व्हिडिओ कॉल करत होता. यावेळी त्याने व्हिडिओ कॉल सुरू असताना मुलीचे अश्लील फोटो काढले. काही दिवसांनी हेच फोटो त्याने सोशल मीडियावर चक्क व्हायरल केले. तसेच इतर काही लोकांना देखील हे फोटो पाठवून मुलीची बदनामी केली. याप्रकरणी मुलीने तिच्या वडिलांना सांगितले असता या मुलाने तिच्या वडिलांना आणि भावाला देखील शिवीगाळ केली होती. अखेर या मुलाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्याचे कळताच आरोपी पुण्यातून फरार झाला. काही दिवसांपासून त्याचा शोध सुरू होता. तांत्रिक पद्धतींच्या आधारे या तरुणाचा पोलीस माग काढत होते. आणि अखेर हा मुलगा मुंबईतील चेंबूर या ठिकाणच्या देवनार परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या एका पथकाने चेंबूरमध्ये त्याचा शोध घेत त्याला अटक केली.
याप्रकरणी भारतीय न्याय संहिता 500, 504, 506 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000 चे कलम 66 (इ), 67 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर दशरथ सिद्धराम गायकवाड उर्फ वनराज आश्विन देशमुख (वय- 32, रा. संतोष नगर, पाण्याचे टाकीजवळ, शनिमंदिर समोर, पुणे) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत गायकवाड याने गुन्ह्याची कबुली दिली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी मोबाईल जप्त केला होता. हा मोबाईल चेक केला असता गायकवाड हा अनेक मुलींशी अशाच प्रकारे चॅटिंग करत होता. आणि इतरही काही मुलींना त्याने व्हिडिओ कॉल करून त्रास दिला असून त्यांचे देखील अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.