LONAND MURDER CASE: सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील लोणंद या शांत परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मोबाईल वापरण्यावरून झालेल्या किरकोळ वादाने अखेर एका तरुणाचा (LONAND MURDER CASE) जीव घेतला. वयाच्या अवघ्या २२ व्या वर्षी गणेश संतोष गायकवाड या तरुणाचा मृत्यू झाला असून, ही हत्या त्याच्यासोबत राहणाऱ्या रूम पार्टनरनेच केल्याचं पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे. ही घटना केवळ लोणंद परिसरातच नव्हे, तर संपूर्ण सातारा जिल्ह्यात खळबळ उडवणारी ठरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश आणि आरोपी रूम पार्टनर यांची ओळख लोणंद येथील एका मेसमध्ये झाली होती. दोघेही शिक्षण आणि नोकरीसाठी बाहेरून आले होते आणि एकाच खोलीत राहात होते. काही दिवसांपासून (LONAND MURDER CASE) त्यांच्या दोघांमध्ये मोबाईल वापरण्याच्या सवयीवरून वाद होत असल्याचं शेजाऱ्यांनी सांगितलं. मात्र, हा किरकोळ वाद इतका गंभीर वळण घेईल याची कुणालाही कल्पना नव्हती.
YOGESH KEDAR ON OBC AARKSHAN: आझाद मैदानावर बारा बलुतेदार समाजाचा मोर्चा
प्राथमिक चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, आरोपी रूम पार्टनरने रागाच्या भरात गणेश झोपेत असताना प्रथम त्याचे डोके भिंतीवर आपटले. त्यानंतर कमरेला असलेल्या पट्ट्याने त्याचा गळा आवळून हत्या केली. सकाळी मृतदेह (LONAND MURDER CASE) आढळताच परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच फॉरेन्सिक तज्ज्ञ, फिंगरप्रिंट एक्स्पर्ट आणि डॉग स्क्वॉड घटनास्थळी दाखल झाले. तपासादरम्यान ज्याने पोलिसांना ही माहिती दिली तोच प्रत्यक्षात आरोपी असल्याचं लक्षात आलं. त्याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली आणि अखेर त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले, पोलिस निरीक्षक रोहित हेगडे आणि क्राईम ब्रँचच्या पथकाने अवघ्या दोन तासांत गुन्हा उघडकीस आणला. पोलिसांच्या या तत्परतेमुळे आरोपी अल्पवयीन असल्याचेही समोर आले. त्यामुळे त्याला ताब्यात घेतल्यानंतर बाल न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे.
या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मोबाईलसारख्या क्षुल्लक कारणावरून जीवघेणी घटना घडल्याने युवकांमधील वाढती असहिष्णुता आणि मानसिक ताण यावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुशील भोसले यांनी सांगितले की, प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, आरोपीची पुन्हा चौकशी केली जाणार आहे. गणेश गायकवाडच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर आणि मित्रांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, लोणंदसारख्या शांत गावात या घटनेने भीतीचं सावट निर्माण झालं आहे.