Latur Accident

Latur Accident : भरधाव कार हॉटेलमध्ये घुसल्याने 2 जणांचा मृत्यू; Video आला समोर

678 0

लातूर : लातूरमधून (Latur Accident) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट हॉटेलमध्ये घुसल्याने 2 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

काय घडले नेमके?
लातूर – सोलापूर महामार्गावर हा अपघात झाला. महामार्गावरुन जाणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार थेट औसा येथील सीएनजी पंपाच्या बाजूला असलेल्या एका हॉटेलमध्ये घुसल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात कारमधील दोघांचा उपचारासाठी घेऊन जात असतानाच मृत्यू झाला आहे. तर चार जणांना गंभीर मार लागला असून त्यांच्यावर लातूरच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यात गंभीर जखमी मधील तिघे जण कारमधील आहेत तर एक जण हॉटेलमध्ये काम करणारा लहान मुलगा आहे. या चौघांची ही प्रकृती चिंताजनक आहे.

हा अपघात इतका भीषण होता की कारचा चुराडा झाला आहे. या अपघाताचा थरार हॉटेलसमोर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. हा अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे. लातूर पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Lok Sabha Elections : ‘…तोपर्यंत आम्ही मविआच्या एकाही कार्यक्रमात सहभागी होणार नाही’ प्रकाश आंबेडकरांचे मोठे विधान

Ind Vs Eng : टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा, 1 इनिंग आणि 64 धावांनी दणदणीत विजय

Pune News : दर्ग्यालगतचे बेकायदा बांधकाम हटवण्यासाठी PMC दाखल; पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त

Maratha Reservation : मराठा पुन्हा एकवटणार; मनोज जरांगे यांनी केली ‘ही’ मोठी घोषणा

Beed News : करुणा मुंडेंच्या कार्यक्रमात जोरदार राडा

Pune News : बंगळुरू स्फोटाप्रकरणी एनआयएचं पथक पुण्यात दाखल

Bhopal Fire : भोपाळमध्ये मंत्रालयाला भीषण आग; 4 मजले आगीमध्ये जळून खाक

Maharashtra Politics : ठाकरे गटाचा ‘हा’ मोठा नेता पक्षावर नाराज? कार्यकर्त्यांना केले ‘हे’ भावनिक आवाहन

Naukasana : नौकासन म्हणजे काय? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!