KUDAL POLICE NEWS भारत पाकिस्तान मध्ये संघर्षाचे वातावरण असताना या युद्ध सदृश्य परिस्थितीत कुडाळ पोलीस ठाण्याचा फोन वाजला आणि “इंडीया को उडाना है। ईनशा अल्लाह, मेरे भाईजान आ रहे है” असा निरोप समोरच्या व्यक्तीने दिला. नंतर संपूर्ण पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली. सर्वतोपरी प्रयत्न करून हा फोन नेमका कोणी केला का केला आणि खरंच असं काही घडणार आहे का याचा आता पास पोलिसांनी लावला. आणि त्यानंतर समोर आलं धक्कादायक सत्य…
‘ईनशा अल्लाह, इंडिया को उडाने भाईजान आ रहे है’ पोलिसांना आला फोन अन् पुढे घडलं भयंकर..
भारताकडून पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर राबवलं जात असताना नऊ मे रोजी आपत्कालीन परिस्थितीत तातडीने पोलिसांना माहिती देण्यासाठी असलेल्या 112 या क्रमांकावर फोन आला. फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीने अतिशय धक्कादायक माहिती दिली. “इंडीया को उडाना है। ईनशा अल्लाह, मेरे भाईजान आ रहे है” असं म्हणून समोरच्या व्यक्तीने फोन ठेवला. त्यानंतर लगेचच कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी गंभीर दखल घेवून तात्काळ हा फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरु केला. एकीकडे युद्ध सदृश्य परिस्थिती दुसरीकडे धडकी भरवणारा हा फोन.. त्यामुळे संपूर्ण पोलीस प्रशासन कामाला लागलं. सुरक्षेत वाढ केली. आणि अखेर फोन करणाऱ्या पन्नास वर्षीय आरोपीचा शोध लावला. नितीन सहदेव तांबे, असे या व्यक्तीचे नाव असून तो कुडाळमधीलच बुद्रुक टेंबवाडी या परिसरात वास्तव्यास आहे. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याचा दहशतवाद्यांशी कोणताही संबंध नसल्याचं उघडकीस आलं. त्याने केवळ खोडसाळपणा करण्याच्या उद्देशाने हा फोन केल्याची कबुली दिली. त्यामुळे या व्यक्तीवर कुडाळ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देशात तणावाची स्थिती असल्यामुळे सगळ्याच तपास यंत्रणा स्वतःचा जीव धोक्यात घालून सर्वसामान्य जनतेची सुरक्षा करताना दिसत आहेत. मात्र आपात्कलीन स्थितीत पोलिसांची मदत मागवण्यासाठी दिलेल्या नंबर वर फोन करून अशा पद्धतीने खोडसाळपणा करण्याच्या घटना गेल्या काही दिवसांमध्ये वाढत आहेत. त्यामुळेच असे प्रकार आढळल्यास आरोपीवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिलाय.
CRIME NEWS| लॉन्ग ड्राईव्ह, नूडल्स- आईस्क्रीम, अन्… प्रेम प्रकरणाचा थरकाप उडवणारा शेवट
PURANDAR INTERNATIONAL AIRPORT| पुरंदर विमानतळावरून पोलीस शेतकरी आमने-सामने
STATE CABINET DECISION: राज्य मंत्रिमंडळ बैठकीत कोणते झाले मोठे निर्णय?