Kondhwa Pune Shooting: पुणे पुन्हा एकदा गुन्हेगारीत हादरलं. कोंढवा परिसरातील खडी मशीन चौकात गोळीबार झाला. या गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीच नाव गणेश काळे असं असून या व्यक्तीवर गोळीबार (Kondhwa Pune Shooting) करण्यात आला व त्याच बरोबर या व्यक्तीवर कोयत्याने वार देखील करण्यात आले. गणेश काळे हा रिक्षाचालक असून वय वर्ष ३२ होत. तो आपली रिक्षा चालवत असतानाच त्याचा दोन व्यक्ती पाठलाग करत होते कोंढव्यातील खडी मशीन चौकात दुपारी चारच्या सुमारास या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आला.
घडलेल्या घटनेनुसार, प्रथम दर्शनी गणेश काळेवर दोन व्यक्तींनी ६ गोळ्या झाडल्या यातील २ गोळ्या गणेशला लागल्या. व त्या नंतर तिथे आणखी दोन तरुण आले व त्यांनी गणेशावर कोयत्याने वर केले. अद्याप हाती आलेल्या (Kondhwa Pune Shooting) सीसीटीव्ही फुटेजमध्ये घटना स्पष्ट दिसत नसल्यानं अद्याप काहीही स्पष्ट नाही आहे. गणेश काळेच गुन्हेगारी क्षेत्रात काय बॅकग्राऊंड आहे हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु गणेश काळेचा भाऊ समीर काळे हा वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी आहे जो सध्या जेलमध्ये आहे.
MNS-MVA JOINT MORCHA MUMBAI: निवडणूक आयोगाविरोधात विरोधकांचा मोर्चा
हा खून गँगवॉर मधून झाला आहे की काही वैयक्तिक कारणांमुळे हा खून झाला हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. वनराज आंदेकरचा खून जेव्हा झाला तेव्हा तिथे असलेल्या प्रत्यक्ष दर्शींमध्ये गणेश काळे देखील होता असं (Kondhwa Pune Shooting) देखील बोललं जात आहे. दिड महिन्यानंतर पुन्हा एकदा पुण्यात गँगवॉर खवळलं आहे. या प्रकरणाचा पंचनामा सुरु असून या पंचनाम्यानंतर तपस सुरु होईल असं देखील सांगितलं जात आहे.