KOLHAPUR SHIROLI PULACHI VIRAL NEWS: कोल्हापुरातील शिरोली पुलाची (KOLHAPUR SHIROLI PULACHI VIRAL NEWS) गावात मध्यरात्री स्मशानभूमीत अघोरी पूजाविधी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
आत्मा बाटलीत बंद केला’ असा दावा करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
या संपूर्ण प्रकरणामुळे सध्या भीतीचं वातावरण आहे..
गणेश काळे प्रकरणातील आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी
मध्यरात्री काही अनोळखी व्यक्तींनी कोल्हापुरातील शिरोली पुलाची गावच्या स्मशानभूमीत जाऊन अघोरी
तंत्र-मंत्र आणि मंत्रोच्चार सुरू केले. या पूजेत एका मांत्रिकाकडून हातात लिंबू घेऊन जप करण्यात आला..
तसेच तीन भागांत बसून मंत्रांचा उच्चार, आणि काही गावकऱ्यांची नावे घेत अघोरी विधी करण्यात आला.
त्याचबरोबर बाटलीत काहीतरी ठेवून ‘आत्मा बाटलीत बंद केला आहे,
दोन दिवसांत परिणाम दिसेल’ असा दावा करणाऱ्या व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने पसरत आहे.
हा व्हिडिओ वायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झालं.
महाराष्ट्रात अंधश्रद्धा प्रतिबंधक कायदा लागू आहे, ज्याअंतर्गत
अशा प्रकारची तांत्रिक, भानामती, किंवा अघोरी कृत्ये बेकायदेशीर आहेत.
स्मशानभूमीसारख्या सार्वजनिक जागी रात्री धार्मिक किंवा तांत्रिक विधी करणे कायद्याने अपराध ठरतो.
अघोरी विद्या करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी गावकऱ्यांकडून होतं आहे.
शिरोली गावातील स्मशानभूमीतील अघोरी पूजाविधीमुळे गावकऱ्यांची चिंता वाढली आहे.
याआधीही कोल्हापुरातील स्मशानभूमीमधील अघोरी प्रकार अनेकदा समोर आले आहेत.
त्यामुळे नागरिकांची भीती दूर करण्यासाठी
प्रशासनाने तातडीने कारवाई करून परिसरात सुरक्षा यंत्रणा आणि
वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्याची आवश्यकता असल्याचं मतं गावकऱ्यांकडून व्यक्त केलं जातंय.