Kolhapur Accident

Kolhapur Accident : कोल्हापुरमध्ये भीषण अपघात! ट्रकने चिरडल्याने 4 जणांचा मृत्यू

415 0

कोल्हापूर : कोल्हापुरमधून एक भीषण अपघाताची (Kolhapur Accident) घटना समोर आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे बंगळुरु महामार्गावरील वाठार गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकने मजुरांना धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला आहे तर 7 जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले.

काय घडले नेमके?
सिमेंट काँक्रीटचे मिक्सर मशीन रस्त्याच्या कडेला लावत असताना पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने उडवल्याने भीषण अपघात झाला. यात चार जण ठार तर सात जण गंभीर जखमी झाले. हा भीषण अपघात रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडला. टेम्पोला जोडलेले सेंट्रिंगचे मिक्सर मशीन रस्त्याकडेला उभं करत असतानाच पाठीमागून भरधाव आलेल्या ट्रकने मजुरांना जोराची धडक दिली. अपघातातील मृत व जखमी सेंट्रींग कामगार भादोले गावचे रहिवासी आहेत.

या भीषण अपघातात सचिन धनवडे (वय 40) बाबालाल इमाम मुजावर (वय 50), विकास वड्ड (वय 32),आणि श्रीकेश्वर पासवान (वय 60) असे एकूण 4 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर सुनिल कांबळे,सचिन नलवडे ,लक्ष्मण मनोहर राठोड, ऐश्वर्या लक्ष्मण राठोड, सविता लक्ष्मण राठोड ,कुमार अवघडे अन्य एक (सर्व रा.भादोले ) हे सात जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमींवर कोल्हापुरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय आणि पेठ वडगाव इथल्या एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Railway Accident : साबरमती -आगरा सुपरफास्ट एक्स्प्रेसचा भीषण अपघात

वीरासन म्हणजे काय; काय असतात फायदे आणि काय काळजी घ्यावी?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!