KOLHAPUR NCP LAKHAN BENADE: कोल्हापुरातील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा अमानुष खून करून दोन तुकडे करून फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनं राज्यभरात एकच खळबळ उडाली असून या हत्येमागचं मूळ कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

KOLHAPUR NCP LAKHAN BENADE: भयानक हत्याकांडानं महाराष्ट्र हादरला! राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याची हत्या, मृतदेहाचे तुकडे थेट कर्नाटकाच्या नदीत

101 0

KOLHAPUR NCP LAKHAN BENADE: कोल्हापुरातील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा अमानुष खून करून दोन तुकडे करून फेकून दिल्याची घटना समोर आली आहे.

या घटनेनं राज्यभरात एकच खळबळ उडाली असून या हत्येमागचं मूळ कारण अद्यापही अस्पष्ट आहे.

VIDEO NEWS: सरकारी रुग्णालयात मृतदेहाची हेळसांड ? ; भरपावसात स्ट्रेचरवर ठेवला मृतदेह

लखन बेनाडे असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे.

बेनाडे हे हातकणंगले तालुक्यातील रांगोळी गावाचे ग्रामपंचायत सदस्य होते.

त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे दाखल असून त्यांचं गुन्हेगारांमध्ये आणि राजकीय नेत्यांमध्ये ही वजन होतं.

ते अनेक दिवसांपासून राष्ट्रवादीचं काम करत होते. मात्र राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर त्यांनी अजित पवारांची राष्ट्रवादी निवडली.‌

गुन्हेगारी आणि राजकारण एकत्रच सुरू असल्यानं ते कायमच वादग्रस्त राहिले.

लैंगिक अत्याचाराच्या एका गुन्ह्यात पोलिसांकडून

त्यांचा शोध सुरू असताना ते

अचानक शरद पवार यांच्या घरासमोर सुरू असलेल्या आंदोलनात दिसले होते.

Junner Crime News : जुन्नर मधील रिव्हर्स वॉटरफॉल जवळील दरीत आढळले मृतदेह

त्याची मोठी चर्चाही झाली. मात्र हेच बेनाडे आठ दिवसांपासून बेपत्ता होते. त्यांची बहीण नीता उमाजी तडाखे यांनी गावभाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

त्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला. या दरम्यान बेनाडे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध असून गेल्या काही दिवसांपासून या दोघांमध्ये वाद सुरू असल्याचं निष्पन्न झालं.

त्याचं अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला, त्यावेळी काही संशयित आरोपी हे स्वतःच पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यांनी बेनाडे यांचा खून केल्याची कबुली ही दिली.

बेनाडे यांचा निर्घृण खून करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेहाचे दोन तुकडे केले. मृतदेह जाळण्याचा प्रयत्नही केला.

त्यानंतर अर्धवट जळालेले मृतदेहाचे तुकडे कर्नाटकातील हिरण्यकेशी नदीत संकेश्वरजवळ फेकून दिल्याची माहिती संशयीतांनी दिली..

या माहितीवरून पोलिसांचं पथक कर्नाटकात पोहोचलं असून मृतदेहाचा शोध सुरू आहे.

दरम्यान ही हत्या सुमारे पाच ते सहा दिवसांपूर्वी केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.

या प्रकरणातील चार संशयितांची कसून चौकशी सुरू आहे.

SHIRDI CRIME: साईनगरी बनली गुन्हेनगरी! आधी खून मग बर्थडे पार्टी; शिर्डीत अल्पवयीन टोळक्याचा राडा
लखन बेनाडे यांचे अनैतिक संबंध असलेल्या महिलेचे सोशल मीडियावर वाद सुरू होते. हे दोघेही एकमेकांच्या विरोधात रील्स बनवत होते. हे रील सोशल मीडियावर व्हायरल देखील झाले.

नऊ जुलै रोजी त्यांची सोशल मीडियावर शेवटची पोस्ट दिसली. त्यानंतरच ते गायब झाले. त्यामुळे या प्रकरणामध्ये महिलेचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

त्या दृष्टिकोनातून तपास सुरू असला तरीही या हत्याकांडामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.

Share This News
error: Content is protected !!