30 रुपयांवरून मित्राची हत्या; आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मैत्रीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एका मित्रानेच मित्राची हत्या केली. मुंबईतील कुर्ला येथे ऑटोरिक्षाचे 30 रुपये भाडे देण्याच्या कारणावरून एका व्यक्तीने आपल्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही घटना मुंबईतील कुर्ला परिसरात घडली. या प्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने आरोपीला ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, छक्कन अली, असे मृत तरुणाचे नाव आहे. तर आरोपी सैफ जाहिद अली हे दोघेही उत्तर प्रदेशातील गोंडा जिल्ह्यातील रहिवासी होते. दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते. नोकरीसाठी हे दोघे काही दिवसांपूर्वी मुंबईत आले होते. त्यानंतर कापडाच्या एका कारखान्यात दोघेही काम करत होते. या दोघांच्यात ऑटो रिक्षाचे भाडे देण्यावरून वाद झाले. आणि अवघ्या 30 रुपयांसाठी सैफ अली याने छक्कन याची हत्या केली.
या घटनेची माहिती मिळाल्यापासून पोलीस आरोपीच्या मागावर होते. आणि अखेर कल्याण रेल्वे स्थानकाजवळून गुन्हे शाखेने जाहिद अली याला अटक करून कुर्ला पोलिसांच्या ताब्यात दिले.