तू मला का टाळतेस’ म्हणत केली तरुणीची हत्या; पिंपरी चिंचवडमधील हत्याकांडांपूर्वी नेमकं काय घडलं, वाचा सविस्तर

445 0

राज्यात सध्या महिला हत्याकांडांच्या दोन-तीन घटनांमुळे संतापाचे वातावरण तयार झाले आहेत. उरणमध्ये यशश्री शिंदे या वीस वर्षीय तरुणीची हत्या करून छिन्नविच्छिन्न अवस्थेत तिचा मृतदेह टाकून देण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला पोलिसांनी अटक केली आहे. तर कालच उघडकीस आलेल्या पिंपरी चिंचवड मधील हत्याकांडा मागचे मोठे कारण समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्राची ही सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील उरण इस्लामपूर या गावची रहिवासी होती. त्याच भागात राहणाऱ्या अविराज रामचंद्र खरात याचे प्राचीवर एकतर्फी प्रेम होते. त्यामुळेच त्याने तिच्या पोटावर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून तिची हत्या या प्रकरणी आरोपीला केवळ बारा तासांमध्ये बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आले आहे.

या प्रकरणात आरोपीने तरुणीचा खून का केला आणि खुन करण्याआधीचा संपूर्ण घटनाक्रम समोर आला आहे. मयत आणि आरोपी दोघेही एकाच गावचे होते. त्या दोघांची मैत्री होती. पण अविराजचे प्राचीवर एकतर्फी प्रेम होते. प्राचीला मात्र मैत्रीच्या पुढे कोणतेही नाते ठेवायचे नव्हते. अशातच डिप्लोमाचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती पुण्याच्या चाकण एमआयडीसीमध्ये नोकरीसाठी आली. बदललेली जीवनशैली, नोकरीचा वाढतात ताण यामध्ये प्राची व्यस्त होऊ लागली. प्राची आणि अविराज मध्ये हळूहळू संपर्क कमी होऊ लागला. याचाच राग त्याला आला. याचा जाब विचारण्यासाठी अविराज 28 जुलैला सांगलीहून थेट पुण्यात आला. प्राची काम करत असलेल्या परिसरात त्याने तिला गाठले. विश्वासात घेऊन मैत्रीपूर्ण गप्पा मारण्याच्या बहाण्याने त्याने तिला आंबेठाणच्या दिशेने नेले.

थोड्या अंतरावर गेल्यानंतर अविराजने निर्जनस्थळी गाडी थांबवली व गाडीतून उतरून प्राचीला प्रश्न विचारायला सुरुवात केली. तू मला का टाळतेस ‌? तू माझ्याशी लग्न करायला का नको म्हणतेस? असा जाब विचारत त्याने तिच्याशी वाद घातले आणि तेवढ्यात सोबत आणलेला चाकू बाहेर काढला.‌ प्राचीला काही समजायच्या आत त्याने तिच्यावर वार केले. पुरावा नष्ट करण्याचे हेतूने त्याने तिचा मोबाईल सोबत घेतला आणि मृतदेह तिथेच फेकून देऊन तो सांगलीच्या दिशेने निघाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाची ओळख पटवून पुढील तपास सुरू केला. तरुणीच्या मोबाईल क्रमांकावरून तिने कोणाकोणाला संपर्क केले होते ? तिथे शेवटचे लोकेशन काय होते हे तपासल्यानंतर आरोपी सांगलीच्या दिशेने पळून गेल्याचे लक्षात आले व पोलिसांनी सापळा रचून अविराजला कराडजवळून अटक केली.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!