KHANAPUR EXTRA MARITAL AFFAIR CASE: अनैतिक संबंधातून प्रेयसीला संपवून आरोपीने स्वतःलाही संपवलं

65 0

KHANAPUR EXTRA MARITAL AFFAIR CASE: अनैतिक संबंधांमधून होणाऱ्या हत्यांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत.

त्यातच खानापूरच्या बिडी गावात एक भयंकर हत्याकांड घडलंय.

अनैतिक संबंधातून बॉयफ्रेंड ने गर्लफ्रेंडच्या घरात घुसून सपासप वार करून तिचा खून केला

तर स्वतःलाही भोसकून संपवल्याची केल्याची घटना घडली आहे.

Mumbai Crime Former OSD:नीलम गोऱ्हेंच्या माजी ओएसडीने निवृत्त पोलीस अधिकाऱ्याला घातला लाखोंचा गंडा
रेश्मा तिरवीर असं हत्या करण्यात आलेल्या महिलेचं नाव असून आनंद सुतार असं आरोपीचं नाव आहे.

रेश्मा आणि तिचा प्रियकर आनंद सुतार हे दोघेही एकाच गावातील रहिवासी होते.

ते दोघेही विवाहित असून रेश्माला दोन मुलं आहेत.

DAUND CRIME CASE: दौंडमध्ये धारदार कोयत्यानं वार; आईच्या बॉयफ्रेंडचा मुलाकडून खून

तर आनंदला तीन मुलं असून त्याची पत्नी गर्भवती आहे.

दोघांनाही आपापली कुटुंब असताना या दोघांचे दोन वर्षांपासून अनैतिक संबंध सुरू झाले.

Junner Crime News : जुन्नर मधील रिव्हर्स वॉटरफॉल जवळील दरीत आढळले मृतदेह

काही दिवसांपूर्वी रेश्माच्या पतीला या दोघांच्या नात्याबद्दल समजलं. त्यावेळी त्याने पोलिसात तक्रार दाखल केले.

पोलिसांनी आरोपी आनंदला रेशमाशी सगळे संबंध तोडण्याची ताकीद दिली. व समज देऊन त्याला सोडण्यात आलं.

मात्र याचाच राग आनंदच्या मनात बसला. त्यामुळेच त्याने गुरुवारी रात्री रेश्माला भेटण्यासाठी थेट तिचं घर गाठलं.

मात्र भेटीच्या बहाण्याने त्याने थेट तिच्यावर धारदार चाकूने हल्ला केला. त्याने तिला नऊ वेळा चाकूने भोसकलं.

DAUND CRIME CASE: दौंडमध्ये धारदार कोयत्यानं वार; आईच्या बॉयफ्रेंडचा मुलाकडून खून

मात्र एवढ्यावरही न थांबता त्याने स्वतःलाही भोसकून आत्महत्या केली.

हा सगळा प्रकार लक्षात येतात त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. आनंदचा वाटेतच मृत्यू झाला.

BEED CRIME CASE: 5 लाख द्या, अन्यथा…बीडमध्ये संस्थाचालकाला धमकी;नेमकं प्रकरण काय ?
अनैतिक संबंधातून घडलेल्या या हत्या आणि आत्महत्या कांडामुळे बिडी गावात एकच खळबळ उडाली आहे.

नंदगड पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली असून आनंदने रेशमाची हत्या नेमकी कशासाठी केली ?

या हत्येमागे आणखी काही कारणं आहेत का याचा तपास केला जात आहे.

YAVATMAL ZP SCHOOL NEWS: यवतमाळमध्ये जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या मुलीवर अतिप्रसंग

Share This News
error: Content is protected !!