JALNA NEWS:6 महिन्यांपूर्वीच प्रेमविवाह झालेल्या सुनेकडून सासूची हत्या

503 0

सहा महिन्यांपूर्वी प्रेमविवाह करुन घरात आलेल्या सूनेनेच आपल्या सासूची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना जालना शहरात घडली आहे. जालन्याच्या भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी सोसायटीत घडलेल्या या भयंकर घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पाहुयात हे नेमकं प्रकरण काय आहे.

मयत सविता शिंगारे यांचा मुलगा आकाश शिंगारे यांचा सहा महिन्यांपूर्वी बीड जिल्ह्यातील गेवराईच्या प्रतिक्षा या मुलीशी प्रेमविवाह झाला होता. प्रेम विवाहानंतर आकाश आपल्या परिवारासह जालन्यातील भोकरदन नाका परिसरात असलेल्या प्रियदर्शनी सोसायटीत राहत होता. नोकरीनिमित्त तो लातूर या ठिकाणी असताना त्याची आई सविता आणि पत्नी प्रतीक्षा या सासू- सुना सोबत राहत होत्या. परंतु मंगळवारी रात्री प्रतीक्षाने सासू सविता शृंगारे यांचा अत्यंत क्रूरपणे खून केला. खुनानंतर प्रतीक्षाने सासूचा मृतदेह गोणीमध्ये भरला. मात्र गोणीतून मृतदेह बाहेर नेता येत नसल्याने तिने मृतदेह तसाच टाकून फरार झाली. सकाळी घराच्या मालकाला संशय येताच त्यांनी तातडीने याबाबतीत पोलिसांना कळवलं.पोलिसांनी घर उघडून पाहताच सविता शिंगारे यांचा मृतदेह एका गोणीमध्ये भरलेल्या अवस्थेत आढळून आला. हे भयंकर दृश्य पाहून सर्वजण हादरुन गेले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी या घटनेबाबत नेमकी काय प्रतिक्रिया दिली पाहुयात..

सहा महिन्यांपूर्वीच प्रेम विवाह झालेल्या प्रतीक्षाने सासू सविता शिंगारे यांचा अत्यंत क्रूरपणे खून करून मृतदेह गोणीमध्ये भरून पसार झाली. जालन्याच्या पोलीस सून प्रतीक्षा हिचा कसून शोध घेत आहेत.सूनेने आपल्या सासूला इतक्या निर्घृणपणे का संपवले? या हत्येत आणखी कोणाचा सहभाग होता का? असे अनेक सवाल उपस्थित होत असून या हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Share This News
error: Content is protected !!