JALNA NEWS: जालना हादरलं! क्रीडा शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग! पाहा नेमकं काय घडलं?

232 0

JALNA NEWS: जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनीतील एका क्रीडा शिक्षकाने

4 विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा संतापजनक प्रकार समोर आल्यानंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे.

JALNA NEWS:क्रीडा शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग!
जालना शहरातील क्रीडा प्रबोधिनीत ग्रामीण भागातील अल्पवयीन विद्यार्थिनी क्रीडा शिक्षण घेतात.

या ठिकाणी क्रीडा शिक्षक प्रमोद खरात हा व्यवस्थापक म्हणून काम पाहतो. याच क्रीडा शिक्षकाकडून येथील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांना मिळाली होती.

बन्सल यांना सरद प्रकरणासंदर्भात आधीपासूनच शंका असल्याने सहायक पोलिस निरीक्षक आरती जाधव यांनी या पीडित मुलींची चौकशी केली.

त्यानंतर हा धक्कादायक प्रकार समोर आला.क्रीडा प्रबोधिनीमधील ज्या खोल्यांमध्ये सीसीटीव्ही नसायचा तिथेच क्रीडा शिक्षक आम्हाला वारंवार घेऊन जायचे.

खोलीमध्ये गेल्यानंतर हा शिक्षक आमच्या छातीवरुन, पाठीवरुन आणि गळ्यावरुन हात फिरवायचा.

SHIRDI CRIME: साईनगरी बनली गुन्हेनगरी! आधी खून मग बर्थडे पार्टी; शिर्डीत अल्पवयीन टोळक्याचा राडा

आमच्यासोबत अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न या शिक्षकाकडून व्हायचा, असा आरोप या पीडित मुलींनी केला आहे.

यासंदर्भात विद्यार्थिनींनी आपल्या पातळीवर प्रशासनाकडे तक्रार दाखल केली होती.

HOTEL BHAGYASHREE; अपहरण, बनाव की स्टंटबाजी ? हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाच्या अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट

या तक्रारीनंतर जालना पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी मनोज कोल्हे आणि महिला केंद्र प्रमुख सुजाता भालेराव यांनी या ठिकाणी भेट दिली.

या वेळेस अनेक विद्यार्थिनींनी असे प्रकार घडत असल्याचे सांगितलं . या प्रकरणात गट शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून क्रीडा शिक्षक आणि प्रबोधिनी व्यवस्थापक प्रमोद खरातच्या विरोधात विनयभंग आणि पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने यापूर्वीही अशाप्रकारे विद्यार्थिनींची छेड काढली आहे का? यापूर्वीही त्याने असे प्रकार केले असतील तर अशा पीडित विद्यार्थिनी किती आहेत? यासारख्या प्रश्नांचाही पोलिस तपास करत आहेत.

 

Share This News
error: Content is protected !!