पिंपरी-चिंचवड शहरात आय पी एल क्रिकेटवर सट्टा घेणाऱ्या चार जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. त्या चौघांना अटक करून पोलिसांनी त्यांच्याकडून आठ मोबाइलसह 27 लाखांचा मुद्देमाल देखील हस्तगत केलाय. पिंपरी-चिंचवड शहरातील राजवाडेनगर, काळेवाडी येथे गुंडाविरोधी पथकानं शनिवारी रात्री ही कारवाई केली.
सटोडी सनी ऊर्फ भूपेंद्र चरणजीतसिंग गिल, रिक्की राजेश खेमचंदानी, सुभाष रामकिसन अगरवाल आणि सनी सुखेजा या चौघांना आय पी एल क्रिकेटवर सट्टा घेतल्या प्रकरणी अटक करण्यात आलीये. त्यांच्याकडील 25 लाखांची रोकड तसेच आठ मोबाईल आणि इतर साहित्य देखील पोलिसांनी जप्त केलंय.