Crime

सांगलीत ओळख, कोल्हापूरमध्ये प्रपोज अन् पुण्यात आणून लैंगिक अत्याचार; अखेर तरुणावर गुन्हा दाखल

468 0

सांगलीच्या तरुणाने कोल्हापूरमध्ये मुलीला प्रपोज करून फिरण्याच्या बहाण्याने पुण्यात आणले व पुण्यात आल्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी सदर तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकं काय घडलं ?

आरोपी तरुण व पीडित मुलगी हे दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिक्षण घेत आहेत. यावेळी त्या दोघांची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. या तरुणाने कोल्हापूरमध्ये मुलीला प्रपोज केले. त्यानंतर मुलीला पुण्याला फिरण्यासाठी जाण्याचा हट्ट केला. या हट्टामुळे मुलगी आरोपी बरोबर पुण्यात आली. त्यानंतर शनिवार वाडा फिरण्यासाठी हा तरुण या मुलीला घेऊन आला. त्यावेळी शनिवार वाड्याच्या जवळच असलेल्या एका हॉटेलमध्ये कॉफी पीत असताना या मुलीबरोबर त्याने अश्लील चाळे केले. त्यावेळीही मुलीने त्याचा विरोध केला होता. मात्र तरीही जबरदस्तीने त्याने मुलीला एका लॉजवर नेत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यावेळी त्याने काही फोटो देखील काढले.

पुढे या तरुणीने लग्नासाठी विचारणा केली असता आरोपीने थेट नकार देत शरीर संबंध ठेवताना चे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. यासंदर्भात पीडित तरुणीने सांगली येथे तक्रार नोंद केली आहे. मात्र हा प्रकार पुण्यात घडल्यामुळे तर सांगली पोलिसांनी हा गुन्हा शुक्रवारी विश्रामबाग पोलीस ठाण्यात वर्ग केला आहे.

या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील यांनी सविस्तर माहिती दिली, त्यानुसार विजय तानाजी डोंबाळे (वय- 24 रा. मु.पो. हिवतड ता. आटपाडी, जि. सांगली) याच्यावर भारतीय दंड संहिता कलम 354, 354(ड), 376/2/एन, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. आरोपीने पीडित मुली बरोबर पुण्यासह सातारा व कोल्हापूर मध्ये देखील अशाच प्रकारे लैंगिक अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. हा प्रकार 18 जून 2023 ते 18 डिसेंबर 2023 या कालावधीत पुणे, सातारा व कोल्हापूर येथे घडला आहे. या संदर्भात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विशाल पाटील यांच्याकडून सुरू आहे.

Share This News
error: Content is protected !!