इंदूर हादरलं ! कुत्रे भांडले अन कुत्रांचे मालक भांडले शेवटी झालेल्या अंधाधुंद गोळीबारात दोघांनी गमावला जीव

345 0

दोन कुत्रांच्या भांडणावरून त्यांचे दोन मालकांचे भांडण झाले याचे याचं पर्यवसान गोळीबारात झालं, ज्यात दोन जणांचा मृत्यू झाला तर इतर सहा जण जखमी झाले आहेत.मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. इंदूरच्या खजराना पोलीस स्टेशन अंतर्गत हा प्रकार घडला. राजपाल रजावत असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे.

कस घडलं हे प्रकरण
बँकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करणारा राजपाल राजावत हा गुरुवारी रात्री आपल्या पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन गेला. त्या वेळी त्याच्या कुत्राच शेजारच्या पाळीव कुत्र्याशी भांडण झाल. यातून शेजारी आणि राजपाल ह्याच्यात सुद्धा भांडण सुरू झालं भांडण बघता बघता एवढं वाढले की राजपाल ने आपल्या जवळ असणाऱ्या परवाना बंदुकीने शेजारील घरात अंधाधूंद गोळीबार केला, या गोळीबारात दोघे मृत पावले हे एकमेकांचे भावोजी आणि मेहुणा आहेत. राहुल वर्मा आणि विमल अमचा अशी त्यांची नावं आहेत.

घराच्या बाल्कनीत उभा राहून केला बेछूट गोळीबार

राजपाल राजावत त्याच्या घरात गेला आणि पहिल्या मजल्यावरच्या बाल्कनीतून उभा राहून एकामागून एक गोळ्या झाडल्या, त्यात राहुल आणि विमल या दोघांचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत, या प्रकरणात पोलिसांनी राजपाल रजावत त्याचा मुलगा आणि एक नातेवाईक याना आरोपी म्हणून अटक केली आहे. अशी माहिती अतिरिक्त पोलीस उपायुक्त अमरेंद्र सिंह यांनी दिली.

हा सर्व थरकाप शेजारच्यांनी व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद केला आहे . गोळीबार होत असताना शेजारच्यांनी स्वतःला घरात कोंडून ठेवले होते राजपालचे नेहमीच आपल्या शेजाऱ्या बरोबर या कुत्रावरून वाद होत होते. वादाच कारण त्याचा कुत्राच असायचा.

Share This News
error: Content is protected !!