Indore Couple Missing:हनिमूनमधून थेट मृत्यूच्या दरीत इंदोरमधील ‘त्या’ जोडप्या सोबत मेघालयात नेमकं काय घडलं?

478 0

Indore Couple Missing मेघालयात हनिमूनसाठी गेलेले इंदूर येथील नवविवाहित जोडपं अचानक बेपत्ता झालं.

त्यानंतर तब्बल 11 दिवसांनी पती राजा रघुवंशी यांचा मृतदेह सापडला. Indore Couple Missing

तर, त्यांची पत्नी सोनम अजून बेपत्ता आहे.. पाहुयात हे सगळं हादरवणार प्रकरणं नेमकं काय आहे?

SHARAD MOHOL याच्या मारेकऱ्यांचा बदला घेण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला PUNE CRIME BRANCH कडून अटक

राजा रघुवंशी आणि सोनम यांचं लग्न 11 मे रोजी इंदूरमध्ये झालं.

त्यानंतर 20 मे रोजी हे जोडपे हनिमूनसाठी मेघालयला गेले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे जोडपे 22 मे रोजी भाड्याने घेतलेल्या स्कूटरने मावलाखियात गावात पोहोचले आणि तेथून 3000 पायऱ्या उतरून नोंगरियात गावात पोहोचले

PUNE CRIME NEWS: गर्लफ्रेंडकडून लग्नास नकार अन् बॉयफ्रेंडने केले ‘ते’ व्हिडिओ व्हायरल; पाहा संपूर्ण प्रकरण काय?

आणि तेथून 3000 पायऱ्या उतरून नोंगरियात गावातील प्रसिद्ध ‘लिव्हिंग रूट ब्रिज’ पाहण्यासाठी गेले…
त्यानंतर एका होमस्टेमध्ये ते रात्रभर राहिले आणि 23 मे रोजी सकाळी निघून गेले.

पण काही तासांनंतर ते बेपत्ता झाले.

24 मे रोजी शिलाँग-सोहरा रस्त्यावरील एका कॅफेजवळ त्यांची स्कूटर सोडून दिलेली आढळली, त्यानंतर पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध सुरू केला.

त्यानंतर ड्रोनच्या साह्याने पोलिसांनी या जोडप्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली..

AHILYANAGAR CRIME NEWS: इंस्टाग्रामवरील ‘तो’ मेसेज  अन् गेला तरुणाचा जीव; पुण्यातील तरुणाची अहिल्यानगरमध्ये हत्या

पण अकरा दिवसानंतर राजा रघुवंशी यांचा मृतदेहनोंग्रिअट गावापासून २० किमी अंतरावर असलेल्या वेई सोडोंग धबधब्याजवळ १०० फूट खोल दरीत आढळला.

राजाच्या उजव्या हातावरील ‘राजा’ टॅटू आणि त्याच्या मनगटावरील वॉटरप्रूफ स्मार्टवॉचवरून मृतदेहाची ओळख पटली.घटनास्थळावरून एका महिलेचा पांढरा शर्ट, पेंट्रा 40 औषधाची पट्टी, तुटलेला मोबाईल फोन एलसीडी स्क्रीन आणि स्मार्टवॉच पोलिसांकडून जप्त करण्यात आला आहे.

PUNE DEEPAK MANKAR SON | दीपक मानकरांच्या मुलासह व्याह्यावर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण?

Share This News
error: Content is protected !!