संतोष देशमुख हत्या प्रकरण: एसआयटी ॲक्शन मोडवर; 24 तासात पहिल्या संशयिताला घेतलं ताब्यात

SANTOSH DESHMUKH : संतोष देशमुख हत्या प्रकरण: एसआयटी ॲक्शन मोडवर; 24 तासात पहिल्या संशयिताला घेतलं ताब्यात

673 0

मस्साजोगचे सरपंज संतोष देशमुख (santosh deshmukh) यांच्या हत्येला 24 दिवस पूर्ण झाले असून या प्रकरणाचा तपास सीआयडी (CID) करत आहे. सीआयडीने आत्तापर्यंत 116 जणांची चौकशी केली असून त्या पाठोपाठ सरकारने गठीत केलेल्या विशेष चौकशी पथक म्हणजेच एसआयटीने (SIT) फक्त 24 तासातच कामाला वेग आणला आहे. एसआयटी पथकाने संतोष देशमुख खून प्रकरणी एका संशयीत आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी हिवाळी अधिवेशना दरम्यान विशेष चौकशी पथकाची (SIT) घोषणा केली होती. यानंतर बुधवारी एसआयटी स्थापनेबाबत गृह विभागाकडून अधिकृत आदेश काढण्यात आले. दहा जणांचा समावेश या पथकात करण्यात आला. आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्त्वात हे पथक काम करत आहे.

संशयित ताब्यात 

एसआयटी स्थापन झाल्याबरोबरच ॲक्शन मोड मध्ये आली आहे. 24 तासातच या प्रकरणातील एका संशयीत आरोपीला एसआयटीने ताब्यात घेतले आहे. गेल्या दोन तासापासून त्याची चौकशी सुरू आहे. हा संशयित सरपंच देशमुख खून प्रकरणातील मुख्य फरार आरोपीचा नातेवाईक असल्याची माहिती समोर येत आहे.

एसआयटीने दिवसभर काय काय केले?

• दुपारी एक वाजता एसटीचे प्रमुख बसवराज तेली केज शासकीय विश्रामगृहात दाखल झाले.
• केज पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या दोन तासात मॅरेथॉन बैठका घेतल्या.
• फरार असलेल्या आरोपींच्या संशयित बायकाला ताब्यात घेऊन 2 तास कसून चौकशी केली.
• एसआयटी पथकाची धनंजय देशमुख यांनी भेट घेतली.
• एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांच्याकडून अटक आरोपींची चौकशी

Share This News
error: Content is protected !!