MUMBAI KIDNAP CASE: तरुणांचं अपहरण, ओरल सेक्स आणि व्हिडिओ शूट; मुंबईतील भयंकर प्रकार!

MUMBAI KIDNAP CASE: तरुणांचं अपहरण, ओरल सेक्स आणि व्हिडिओ शूट; मुंबईतील भयंकर प्रकार!

52 0

मुंबई: मुंबईतून एका अल्पवयीन मुलाचं आणि त्याच्या मित्राचं अपहरण (MUMBAI KIDNAP CASE) करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. मुंबईहून पुणे आणि पुण्याहून पुन्हा मुंबईला या तरुणांना नेण्यात आलं. या पूर्ण प्रवासात त्यांना बेदम मारहाण करून चक्क ओरल सेक्स करायला भाग पाडल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे.

ती घटना मुंबईत 4 जुलै रोजी घडली. पीडित अल्पवयीन तरुण आणि त्याचा 19 वर्षीय मित्र हे दोघेही दक्षिण मुंबईत वास्तव्यास आहेत. या सर्व प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या दिलीप गोस्वामी नावाच्या व्यक्तीकडून या दोघांनी काही पैसे उधार घेतले होते. हे पैसे परत न दिल्याच्या रागात गोस्वामी आणि त्याच्या मित्रांनी मिळून हा प्रताप केला. 4 जुलै रोजी हे दोघेही तरुण एकत्र होते. त्यांना गोड बोलून गोस्वामी आणि त्याच्याबरोबर असलेल्या इतर तिघांनी कारमध्ये बसवलं. त्यानंतर त्यांचं अपहरण केलं. या कार मध्ये दोन पिडीत तरुणांसह मुख्य आरोपी असल्याचा आरोप ज्याच्यावर करण्यात आला आहे तो दिलीप गोस्वामी, पंजूभाई गोस्वामी, धीरज आणि भारत नावाचे तरुण होते. ही कार मुंबईहून पुण्याला नेण्यात आली. प्रवासादरम्यान दोघांनाही लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण करण्यात आली. पुन्हा हे सर्व जण मुंबईच्या दिशेने निघाले. यावेळी भुलेश्वर परिसरात असलेल्या गोस्वामीच्या कार्यालयात गाडी थांबवण्यात आली. तिथे या दोघांना पुन्हा मारहाण केली. मारहाण करतानाच त्यांना ओरल सेक्स करायला भाग पडलं. बळजबरीने या सगळ्याचा व्हिडीओ शूट करण्यात आला. दरम्यान हे दोन्ही तरुण आपल्या जीवाची भीक मागत लवकरात लवकर पैसे परत देऊ असं आश्वासन आरोपींना देत होते. त्यामुळे लवकर पैसे परत देण्याच्या अटीवर या दोघांनाही सोडण्यात आलं. अल्पवयीन मुलाने घरी पोहोचताच त्याच्या आईला घडलेला सर्व प्रकार सांगितला. त्यावेळी पीडित मुलाने त्याच्या आईसह दक्षिण मुंबई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर हा सगळा गंभीर प्रकार समोर आला.

अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी चौंघांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानंतर मुख्य आरोपी दिलीप गोस्वामी याला अटकही केली. मात्र या प्रकरणातील इतर तीन आरोपींचा छडा लागलेला नसून त्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान या सगळ्या धक्कादायक प्रकरणानंतर दोन्ही पीडित तरुण हे प्रचंड शारीरिक आणि मानसिक तणावात असल्यामुळे यांचं समुपदेशन करण्यात येत आहे.

https://youtu.be/MvU86oSAgik?si=ubzM7_Y3EANc1nWc

Share This News
error: Content is protected !!