Illegal Gas Refilling in Nashik:नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात अवैध गॅस रिफिलिंगचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या (Illegal Gas Refilling in Nashik) पथकाने सिन्नर तालुक्यातील दोडी गावात छापा टाकून तब्बल ४३ गॅस सिलेंडर आणि गॅस रिफिलिंगसाठी वापरले जाणारे संपूर्ण साहित्य जप्त केले आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही महत्त्वपूर्ण कारवाई करण्यात आली आहे. दोडी गावातील शिवारात काही व्यक्ती घरगुती वापराच्या लाल रंगाच्या गॅस सिलेंडरमधील वायू (Illegal Gas Refilling in Nashik) अवैधरित्या काढून, तो व्यापारी वापराच्या निळ्या रंगाच्या सिलेंडरमध्ये भरत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. या माहितीच्या आधारे LCB पथकाने तात्काळ सापळा रचून या ठिकाणी छापा टाकला.
HINDU ECONOMIC FORUM:पुण्यात हिंदू इकॉनॉमिक फोरमतर्फे अर्थकारण आणि उद्योजकता या विषयावर परिषद संपन्न
या कारवाईत पोलिसांनी रामदास सुकदेव केदार आणि कैलास अर्जुन केदार अशा दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे दीड (Illegal Gas Refilling in Nashik) लाख रुपयांहून अधिक किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या साहित्यात ३५ घरगुती गॅस सिलेंडर, ८ व्यापारी सिलेंडर, २ पिस्टन पंप, इलेक्ट्रीक मोटर, वजनकाटा आणि गॅस टाकीच्या प्लास्टिक सील्सचा समावेश आहे.
गॅस रिफिलिंगचा हा अवैध व्यवसाय केवळ आर्थिक गैरव्यवहारच नव्हे, तर अत्यंत धोकादायक आणि जीवघेणा आहे. अशा पद्धतीने गॅसची चोरी करताना आणि सिलेंडर बदलताना मोठा अपघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.
याप्रकरणी वावी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आणि गैरव्यवसायांवर यापुढेही कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा दिला आहे.