Murder Video

Murder Video : नवऱ्याने कुऱ्हाडीने वार करत भर बाजारात केली बायकोची हत्या; भयंकर व्हिडिओ आला समोर

929 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंजाबच्या संगरूरमध्ये एक धक्कादायक घटना घटना घडली आहे. यामध्ये एका व्यत्तीने त्याच्या पत्नीवर धारदार कुऱ्हाडीने वार करून भरदिवसा तिची हत्या (Murder Video) केली आहे. संगरुर जिल्ह्यात ही थरारक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ (Murder Video) उडाली आहे. संगरूरच्या सुनम मार्केटमध्ये लोकांच्या गर्दीमध्ये त्याने ही हत्या केली आहे. तसेच ही हत्या केल्यानंतर आरोपी पतीने विष पिऊन आत्महत्या करण्य्याचा प्रयत्न केला. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

काय घडले नेमके?
हाती आलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये घटस्फोटाचा खटला सुरु होता. परंतु, या प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलं आणि सुनम मार्केटमध्ये आरोपी पतीने भरदिवसा पत्नीची कुऱ्हाडीने वार करून हत्या केली आहे. या बाजारात लोकांच्या गर्दीतच या व्यक्तीने पत्नीला संपवलं. पत्नीचा खून केल्यानंतर पतीने विष पिऊन स्वत:चं जीवनही संपवण्याच्या प्रयत्न केला. त्यानंतर त्या व्यक्तीला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती सध्या ठीक आहे.

या भयानक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडीओत पाहू शकता की, पत्नीचा खून केलेला व्यक्ती हाता कुऱ्हाड घेऊन भर बाजारात उभा असल्याचं दिसत आहे. त्या व्यक्तीच्या बाजूला लोकांची गर्दी जमल्याचंही व्हिडीओत पाहायला मिळत आहे. ही हत्या केल्यानंतर लोकांनी त्या व्यक्तीला लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. यादरम्यान आरोपी लोकांना धमकावताना देखील दिसत आहे.

Share This News
error: Content is protected !!