Dombivali Fire

Dombivali Fire : डोंबिवलीतील कंपनीत भीषण स्फोट; अनेक इमारतीच्या काचा फुटल्या

452 0

डोंबिवली : डोंबिवलीमधून (Dombivali Fire) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये पुन्हा एकदा MIDC मध्ये भीषण स्फोट झाला आहे. डोंबिवली पुर्व एमआयडीसी फेज 2 मध्ये अंबर कंपनीत हा भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट एवढा मोठा होता की, स्फोटाचे लांबपर्यंत हादरे बसले, काही इमारतींच्या काचा देखील फुटल्या. दरम्यान हा स्फोट नेमका कशाचा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या स्फोटामुळे डोंबिवलीमध्ये भीतीचं वातावरण आहे.

2016 मध्ये देखील असाच स्फोट झाला
दरम्यान 2016 ला असाच एका केमिकल कंपनीत स्फोट झाला होता त्यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाला होता तर 100 पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले होते. हजारो घरांच्या काच्या फुटल्या होत्या. दरम्यान आता पुन्हा एकदा डोंबिवलीमधील एका कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला आहे. स्फोटानंतर भीषण आग लागली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून, आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

डोंबिवली पुर्व फेज 2 मध्ये एका कंपनीत हा भीषण स्फोट झाला आहे. हा स्फोट एवढा मोठा होता की, स्फोटानंतर जवळपास दोन किलोमीटरपर्यंत लोखंडाचे तुकडे उडाले. त्यानंतर आणखी दोन स्फोट झाल्याचे समजत आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Car Accident : भरधाव कारवरील नियंत्रण सुटलं अन् 4 सेकंदात खल्लास; अपघाताचा Live Video आला समोर

Jalna News : अधिकारी होण्याचं स्वप्न अपूर्णच राहिलं; भरतीसाठी प्रशिक्षण घेताना तरुणाने ग्राऊंडवरच सोडला जीव

Pune News : पुणे रेल्वे स्थानकातील एफओबीवर मनोरुग्ण चढला; Video व्हायरल

Mumbai–Pune Expressway : पुणे – मुंबई महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 4 जण जखमी

Ketaki Chitale : “पोलीस महानालायक असतात…” पुणे पोर्शे कार अपघातावर केतकी चितळेचे ‘ते’ वक्तव्य व्हायरल

Ujani Dam Boat Tragedy : धक्कादायक ! उजनी धरणात संपूर्ण कुटुंबाला मिळाली जलसमाधी

P. N. Patil Pass Away : काँग्रेसचे आमदार पी.एन. पाटील यांचे निधन

Ahmednagar News : प्रवरा नदीत SDRF ची बोट उलटली; 3 जणांचा मृत्यू

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!