Honey Trap Case Thane Police News: Posed as Woman to Chat with MLA; Major Action by Thane Police

HONEY TRAP CASE THANE POLICE NEWS: महिला असल्याचा भास करून आमदाराशी चॅट; ठाणे पोलिसांची मोठी कारवाई

95 0

HONEY TRAP CASE THANE POLICE NEWS: राजकीय वर्तुळात खळबळ माजवणाऱ्या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणाचा चितळसर पोलिसांनी यशस्वीपणे छडा लावला आहे. राज्यातील एका आमदाराला अश्लील संदेश आणि छायाचित्रे पाठवून खंडणी मागणाऱ्या एका तरुणाला पोलिसांनी कोल्हापूर येथून अटक केली आहे. मोहन पवार (वय २६) असे या आरोपीचे नाव असून, तो स्वत: महिला असल्याचे भासवून आमदाराशी व्हॉट्सअॅपवर चॅट करत असे.

Wildlife Smuggling Shock at Mumbai Airport: मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची मोठी कारवाई

याप्रकरणी अधिक माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपी मोहन पवार हा गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून आमदाराच्या संपर्कात होता. (HONEY TRAP CASE THANE POLICE NEWS) त्याने व्हॉट्सअपवर महिला म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आणि आमदाराशी मैत्रीपूर्ण संवाद सुरू केला. हळूहळू या संवादाला अश्लील स्वरूप देत, त्याने आमदाराला अश्लील संदेश आणि छायाचित्रे पाठवण्यास सुरुवात केली.
सन २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीच्या काळात आरोपीने आमदाराला पुन्हा संपर्क साधून त्रास देण्यास सुरुवात केली. त्याने आमदाराला धमकावून पाच ते दहा लाख रुपयांची खंडणी मागितली. या प्रकारामुळे त्रासलेल्या आमदारांनी तात्काळ चितळसर पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि रीतसर तक्रार दाखल केली.

NASHIK RPI LEADER PRAKASH LONDHE:प्रकाश लोंढे यांच्या कार्यालयात भुयार;पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला 

आमदारांच्या तक्रारीवरून पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाद्वारे आरोपीचा ठावठिकाणा (HONEY TRAP CASE THANE POLICE NEWS) कोल्हापूरमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील वरुडे यांच्या मार्गदर्शनाखाली चितळसर पोलिसांच्या एका पथकाने तातडीने कोल्हापूर गाठून मोहन पवार याला ताब्यात घेतले.
पोलिसांनी कसून चौकशी केली असता, मोहन पवार याने आपला गुन्हा कबूल केला. तो मूळचा विज्ञान शाखेचा पदवीधर असून सध्या लोणावळ्यातील एका उपाहारगृहात सफाई कामगार म्हणून नोकरी करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपीने केवळ आमदारालाच नव्हे, तर महिला असल्याचा बहाणा करून अनेक प्रतिष्ठित व्यक्तींना अशा प्रकारे फसवलं असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

PALGHAR NEWS: पालघर ‘वर्ल्ड वाईन शॉप’मध्ये नियमबाह्य दारू विक्रीचा प्रकार; काय आहे नेमकं प्रकरण वाचा सविस्तर

या संपूर्ण प्रकरणामागे केवळ आर्थिक फायदा होता की आणखी कोणाचे राजकीय षडयंत्र आहे, याचा सखोल तपास आता पोलीस करत आहेत. या कारवाईत ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण, अप्पर पोलीस आयुक्त विनायक देशमुख, उपायुक्त प्रशांत कदम आणि सहाय्यक आयुक्त मंदार जावळे यांचे मार्गदर्शन लाभले. पोलिसांनी केलेल्या या जलद कारवाईमुळे अशाप्रकारचे गुन्हे करणाऱ्यांना मोठा जरब बसला आहे.

Share This News
error: Content is protected !!