HINJEWADI IT PARK CRIME: हिंजवडी आयटी पार्कमध्ये मोठा डेटा चोरीचा घोटाळा उघड झाला …
82 कोटी रुपयांच्या गुप्त डेटाची चोरी करून माजी कर्मचाऱ्यांनीच कंपनीला आर्थिक गंडा घातला .
VIDEO LINK: AHILYANAGAR CRIME NEWS इंस्टाग्रामवरील आक्षेपार्ह मेसेजने घेतला तरुणाचा जीव
सायबर पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांना अटक केली असून,
या बाबत पोलिसांचा आणखी काहींचा तपास सुरू आहे. पाहूयात हे प्रकरण नेमकं काय?
हिंजवडी आयटी पार्कमधील नामांकित फ्युचरीइम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या
कंपनीतून तब्बल 82 कोटी रुपयांच्या गोपनीय डेटाची चोरी झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
KHANAPUR EXTRA MARITAL AFFAIR CASE: अनैतिक संबंधातून प्रेयसीला संपवून आरोपीने स्वतःलाही संपवलं
कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांनी डेटा चोरी करून स्वतःचीच नवी कंपनी अपेक्स आयकॉनिक्स सोल्युशन स्थापन केली
आणि जवळपास 100 हून अधिक वेबसाईट विकल्या.
GANESHOTSAV 2025: सार्वजनिक गणेशोत्सव जागतिक पातळीवर नेण्याकरिता सर्वांनी मिळून काम करावे
एप्रिल 2024 ते ऑगस्ट 2025 दरम्यान ही संगनमताने डेटा चोरी केली गेल्याच पोलिस तपासात निष्पन्न झालं आहे
.फिर्यादी म्हणून कंपनीचे व्यवस्थापकीय अधिकारी दत्तात्रय प्रभाकर काळे यांनी सायबर पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
तक्रारीनंतर सायबर पोलिसांनी कारवाई करत विश्वजीत मिश्रा, नयूम शेख आणि सागर विष्णू या तीन माजी कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत.
याशिवाय, सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.