Crime

हृदयद्रावक ! पिंपळे गुरवमध्ये फॅब्रिकेशन शॉपमध्ये लोखंडी मशीन अंगावर पडून चिमुकल्याचा मृत्यू…

523 0

पुणे: फॅब्रिकेशन शॉपमध्ये एका चिमुकल्याच्या अंगावर लोखंडी मशीन पडून मृत्यू झाला. पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव परिसरात ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.

एक चिमुकला आपल्या आईसोबत गीता वाशिंग सेंटरमध्ये गाडी धुण्यासाठी आला होता. ही महिला वॉशिग सेंटरला लागून असलेल्या नीता फॅब्रिकेशन शॉपमध्ये बसली होती तर तिचा मुलगा शॉपमध्ये खेळत होता. तो खेळत असताना अचानक एक लोखंडी मशीन त्याच्या अंगावर पडली आणि त्यातच त्याचा पमृत्यू झाला. शॉपमालकानं आपली मशीन योग्य पद्धतीनं इंस्टॉल न केल्यानं ही दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेला कारणीभूत ठरल्याप्रकरणी शॉपचालकाला सांगवी पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

Share This News
error: Content is protected !!