राज्यात महिला अत्याचारांचे प्रमाण वाढत असताना आणखी एक धक्कादाय घटनासमोर आली आहे. मुंबईतील मिरा-भाईंदर परिसरात एका नराधमाने रात्रीच्या वेळी रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरूणीचे छेड काढली व तिच्यावर ब्लेडने वार केले. ही घटना नुकतीच उघडकीस आली असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं ?
मीरा-भाईंदर परिसरातून एक तरूणी आपले काम संपवून रात्री घरी निघाली होती. रस्त्यावर अंधार होता आणि याच अंधाराचा फायदा घेऊन एका अज्ञात इसमाने तिचा पाठलाग करत भररस्त्यात तिची छेड काढली. तरुणीने न घाबरता आरोपीला प्रचंड विरोध केला. स्वतःला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र यामुळे संतापलेल्या तरुणाने तरुणीला मारहाण केली. एवढेच नाही तर त्याने तिच्यावर थेट ब्लेडने वार केले. यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 33 वर्षीय दीपक माळी नावाच्या आरोपीला अटक केली आहे. तर त्याच्यावर कलम 74,75 76,78,118(1),115 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही तपासले. तसेच अनेक लोकांची चौकशी देखील केली. या चौकशी मधून सदर आरोपी हा बोरिवली परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती त्या अनुषंगाने पोलिसांनी शोध घेत दीपक माळी या आरोपीला ताब्यात घेतले.