Haryana Accident

Haryana Accident : बस उलटून झालेल्या अपघातात 6 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू

1195 0

हरियाणा : हरियाणामधून अपघाताची (Haryana Accident) एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. यामध्ये शाळेची बस उलटून 6 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हरियाणातील महेंद्रगड जिल्ह्यातील कनिना शहरात हा अपघात झाला आहे. ही बस नियंत्रणाबाहेर गेल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात सहा मुलांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक विद्यार्थी जखमी झाले आहेत.

हरियाणाच्या महेंद्रगड जिल्ह्यातील कनिना-दादरी रोडवर कनिबा शहराजवळ हा अपघात झाला. महेंद्रगड जिल्ह्यात सुमारे 40 शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस उलटली. या अपघातात सहा मुलांचा मृत्यू झाला आहे. अपघातग्रस्त बस नियंत्रणाबाहेर जाऊन आधी झाडाला धडकली आणि नंतर उलटली. या अपघतामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!