ANJALI DAMANIYA ON GOTYA GITTE: रघुनाथ फड गॅंगवर मकोका; गोट्या गित्ते अद्याप फरार कसा ? ANJALI DAMANIYA
महाराष्ट्राचा बिहार म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या बीड मधील गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत हे ॲक्शन मोडमध्ये आले असून वाल्मीक कराड गॅंगपाठोपाठ आता आणखी एका गॅंगवर मकोका लावण्यात आला आहे. मात्र या गॅंग मधील ती सर्वाधिक गंभीर गुन्हे असलेला मुख्य आरोपी गोट्या गित्ते GOTYA GITTEअजूनही फरार आहे.
सुदर्शन घुले गॅंग पाठोपाठ रघुनाथ फड या टोळीनेही बीडमध्ये हैदोस घातला होता. या गॅंगने 18 ऑक्टोबर 2023 तडोळी येथील शेतकरी सहदेव सातभाई यांच्यावर जलालपूर परिसरात हल्ला केला होता. एका स्कॉर्पिओमधून आलेल्या या टोळीने सातभाई यांना लोखंडी रॉड व काठ्यांनी मारहाण करून त्यांच्याकडील दोन लाख 70 हजार रुपये व मोबाइल लंपास केला. हे पैसे सातभाई डिपॉझिट करायला जात होते.
वाटेतच आरोपींनी त्यांना गाठून त्यांच्याकडे मुद्देमाल चोरला. सातभाई यांना मारहाण करत असताना मुख्य आरोपी रघुनाथ फड याने “याला सोडू नका” अशी धमकी देत परिसरात दहशत माजवली होती. कोर्टाची ऑर्डर आल्यानंतर अनेक महिन्यांनी या प्रकरणात एफ आय आर दाखल करण्यात आली. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया ANJALI DAMANIYA यांनी पोलीस अधीक्षकांशी पत्रव्यवहार देखील केला.
परळी पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरू असून सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी आणि टोळीप्रमुख रघुनाथ रामराव फड याला पोलिसांनी अटक केली.
तसेच टोळीतील इतर सदस्य जसे की जगन्नाथ विक्रम फड, सुदीप रावसाहेब सोनवणे, बालाजी अंकुश दहीफळे, विलास बालाजी गित्ते यांना अटक करून तपास करण्यात आला आहे.
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार कालच या फड गॅंग वर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. यात टोळीवर याआधीही खुनाचा प्रयत्न, अवैध शस्त्र बाळगणे, दरोडा, सरकारी कामात अडथळा अशा प्रकारचे गुन्हे केल्याची नोंद आहेत. त्यामुळेच पोलिसांनी अखेर मकोका लावला. ही एका दृष्टीने चांगली गोष्ट असली तरीही या प्रकरणातील महत्त्वाचे आरोपी असलेले व टोळीतील सदस्य धनराज ऊर्फ राजेभाऊ श्रीरंग फड, ग्यानदेव ऊर्फ गोट्या मारोती गित्ते हे फरार आहेत. याच गोट्या गित्तेला लवकरात लवकर शोधून काढण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे. ‘आपल्याकडे अनेक महिलांनी प्रत्यक्षात येऊन व फोनवरून गित्ते याच्या बाबतीत तक्रारी केल्या आहेत. तो केवळ गुंड नसून महागुंड आहे.
त्याने परिसरात प्रचंड दहशत माजवली असून तो कोणाच्याही घरात घुसून मुलींना थेट उचलून घेऊन जातो आणि पुन्हा घरी आणून फेकतो.
त्यामुळेच इतक्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे हा आरोपी करत असल्याने त्याला तातडीने अटक करण्याची मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे.फड गॅंगवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली असली तरीही अतिशय महत्त्वाचे दोन आरोपी अर्थात गोट्या गित्ते आणि धनराज फड यांना पकडण्यात अजूनही पोलिसांना यश का येत नाही ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. मात्र नव्या अधीक्षकांकडून प्रचंड अपेक्षा असून ते या दोन्ही आरोपींचा शोध घेऊन त्यांना कडक शासन करतील असा विश्वास असल्याचं अंजली दमानिया म्हटल्या आहेत.
India Pakistan ceasefire युद्धविराम तर झाला ! पण 12 मे रोजी घडणार मोठी घडामोड ?
ROHIT SHARMA : रोहित शर्माची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
Local body elections: महापालिका निवडणुका चार महिन्यांच्या आत घ्या ; सुप्रीम कोर्टाचे आदेश