GOTTYA GITTE VIRAL VIDEO: एका हातात नैवेद्य, दुसऱ्या हातात मृत्यूचा फतवा…
बीडच्या परळीतील गोट्या गित्ते नावाचा सुपारी किलर त्याच्या क्रूरतेसाठी ओळखला जायचा. त्याची स्टाईल वेगळी होती…
आणि हेतू फक्त एकच – ‘मालकाचा आदेश आणि नरडीचा घोट.
‘शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओनं गोट्या गित्तेचा क्रूर चेहरा उघड केलाय
.गोट्या गित्ते… बीड जिल्ह्याच्या परळी तालुक्यातला सुपारी किलर…
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील क्रमांक एक चा आरोपी वाल्मिक कराडचा खास पंटर.
पण त्याची हत्या करण्याची पद्धत थरकाप उडवणारी होती…”रात्रीच्या अंधारात तो
त्या माणसाच्या दारात नैवेद्य ठेवायचा…यानंतर ‘राम नाम सत्य है’ असं
ओरडत सगळ्या गावाला ठाऊक करून द्यायचं, की उद्या या घरात मृत्यू येणार आहे…”
एक प्रकारे गावकऱ्यांवर आणि परळीकरांवर मानसिक दडपण निर्माण करायचा.
.परळीकरांना माहिती असलेल्या अनेक घटनांमध्ये गोट्याने अशाच पद्धतीने लोकांचा जीव घेतला होता.”
“महादेव मुंडे, सरपंच बापू आंधळे, सातभाई, मातंग समाजातील तरुण…
या सर्वांच्या हत्या प्रकरणात गोट्याचं नाव समोर आलंय.त्याच्या क्रौर्याचा कळस म्हणजे –
महादेव मुंडे यांचं गळ्याचं मांस घेऊन तो गावात फिरत होता. कारण ‘मालकानं सांगितलं होतं
– नरडीचा घोट घेऊन ये’.””या मालकाचं नाव होतं –
वाल्मिक कराड.परळीच्या राजकारणात आणि गुन्हेगारीत चर्चेत असलेलं हे नाव सध्या
संतोष देशमुख हत्या प्रकरणात जेलमध्ये आहे..गोट्याने इतकी दहशत निर्माण केली होती की,
त्याच्या नावाने गुन्हा दाखल होणारच नाही अशी स्थिती होती.
शिवसेनेचे गलधर म्हणतात की, ‘हाच गोट्या गित्ते पुढे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येसाठी आदर्श बनला…
आणि’त्याच्याच शैलीत मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचाही खून झाला.”
या टोळक्याचे मनोबल इतकं वाढलं होतं की संतोष देशमुख यांचा मृतदेह पोस्ट मॉर्टम रूममध्ये
असतानाही आरोपी केजमध्ये ‘बाप तर बाप असतो’ असे बॅनर लावले होते.
“या टोळीशी संबंधित नाना चौरे नावाच्या व्यक्तीने एका गतिमंद मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप आहे.
त्यानंतर साक्षीदार महिलेच्या घरच्यांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या.
गोट्या गित्ते सध्या फरार आहे. पण त्याचे व्हिडीओ, त्याच्या स्टाईल, आ
णि गलधर यांच्यासारख्या स्थानिक नेत्यांच्या फेसबुक पोस्टमुळे त्याचं राक्षसी कृत्य आता समोर येतं आहे.
कायदा आणि यंत्रणा आता गोट्या गित्तेला कधी आणि कुठे अटक करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.”