Beed:

GANG RAPE: CCTV फुटेज मिळालं; बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात मोठी अपडेट

379 0

बोपदेव घाट सामूहिक बलात्कार प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची तब्बल 25 पथकं कामाला लागली आहेत. तर याच तपासातून आता एक सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींनी घटनास्थळावर नेमकं काय काय केलं, हे आता उघडकीस आलं आहे.

21 वर्षे पीडित मुलगी ही इव्हेंट मॅनेजमेंटचं शिक्षण घेते. तर तिचा मित्र सीएची तयारी करतोय. हे दोघेही रात्री दुचाकी वरून बोपदेव घाटात फिरायला गेले होते. तिथे असलेल्या टेबल पॉइंटजवळ या तीन नराधमांनी या दोघांना गाठलं. त्यानंतर पीडित मुलीच्या मित्राचा शर्ट काढला. त्याच्याच बेल्टने त्याचे पाय बांधले. त्याच्याकडची गाडीची चावी मोबाईल काढून घेतला. त्यानंतर मुलीच्या हातातली चांदीची अंगठी ही काढून घेतली. त्यानंतरच चाकूचा धाक दाखवून या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या मुलीला डोंगराच्या वरच्या भागात घेऊन गेले आणि तिथेच तिला सोडून पळून गेले. त्यानंतर या मुलीने बांधून ठेवलेल्या मित्राला सोडवलं. आणि उपचारासाठी हॉस्पिटल गाठलं.

हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपास सुरू केला आहे. वेगवेगळे सीसीटीव्ही फुटेज लाईव्ह लोकेशन्स शोधले जात आहेत. मात्र ही घटना ज्या ठिकाणी घडली त्या ठिकाणी मोबाईल ला रेंज नसते. तसेच डोंगराच्या या निर्जन भागामध्ये दहा ते बारा किलोमीटरच्या परिसरात कुठेही सीसीटीव्ही कॅमेरा नाही. त्यामुळे या तपासात अडथळा येत आहेत. मात्र तरी देखील एक सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागलंय. ज्यामध्ये हे तीनही संशयित आरोपी उभे असलेले दिसत आहेत.

बोपदेव घाटात सासवड परिसराच्या जवळ तीन संशयित 1 वाजून 36 मिनिटांनी एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. सामूहिक बलात्काराची ही घटना 11 ते 12 च्या मध्ये घडली आहे. त्यामुळेच या मुलीवर अत्याचार केल्या नंतर हे आरोपी सीसीटीव्ही मध्ये दिसणाऱ्या ठिकाणी जाऊन थांबले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्यामुळे यानंतर हे आरोपी कुठे गेले याचा तपास करण्यासाठी शेकडो सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.

पोलिसांना प्राप्त झालेल्या या सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक आरोपी हा तोंडाला कापड बांधत असलेला दिसून येत आहे. त्याने कदाचित अत्याचार करतेवेळीही चेहरा झाकला असेल. त्यामुळेच पीडित तरुणी आणि तिच्या मित्राने केलेल्या वर्णनावरून दोन आरोपींचे स्केच पोलिसांनी काढून घेतले आहेत. त्या आधारे या आरोपींचा शोध सुरू असून पोलिसांची तब्बल 25 पथकं आरोपींच्या मागावर आहेत.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!