GAJYA MARANE MUTTON PARTY

GAJYA MARANE MUTTON PARTY: गजा मारणेची पोलिसांसोबत ‘मटण पार्टी’; साताऱ्यातील ‘त्या’ कणसे धाब्यावर नेमकं काय घडलं

2809 0

GAJYA MARANE MUTTON PARTY: पुण्याचा कुख्यात गँगस्टर गजानन उर्फ गजा मारणे पोलिसांच्या संरक्षणात असताना मटन पार्टी केल्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला.

परंतु ज्या ठिकाणी मटन पार्टी केली, त्या कणसे धाब्यावर नेमकं काय घडलं पाहुयात.

GAJYA MARANE MUTTON PARTY: गजा मारणेच्या मटण पार्टीत नेमकं काय घडलं?
कोथरूड मधील भाजपा कार्यकर्त्याला मारहाण केल्याप्रकरणी पुण्याचा कुख्यात गँगस्टर गजानन उर्फ गजा मारणे याला पोलिसांनी अटक केली. गजा मारणे आणि त्याच्या टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत अर्थात मकोका अतंर्गत कारवाई करण्यात आली. या प्रकरणांमध्ये सुरुवातीला गजा मारणे हा येरवडा कारागृहात बंदिस्त होता. परंतु पुण्यातील गुन्हेगारी विश्वावर त्याचं असलेलं वर्चस्व त्यामुळे त्याला सांगली कारागृहात हलवण्यात आलं. सांगली कारागृहात नेत असताना रस्त्यात साताऱ्यातील कणसे ढाब्या वर आहे. पोलीस व्हॅन थांबून कर्मचाऱ्यांनी मनसोक्त जेवण केलं.इतकेच नाही तर याच वेळी दोन फॉर्च्यूनर आणि एका थार गाडीतून आलेल्या गजा मारणेच्या साथीदारांनी पोलीस व्हॅनमध्ये असणान्या गजा मारणेला मटणाचा बेत दिला. हा संपूर्ण व्हिडिओ कणसे ढाब्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला.काही दिवसानंतर या घटनेची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली.त्यांनी तातडीने गुन्हे शाखेतील या कर्मचाऱ्यांना फैलावर घेतले. संबंधित कणसे धाब्यावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून घटनेची पुष्टी करण्यात आली.

यानंतर संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली.तर गजा मारणेला येरवडा कारागृहातून सांगली कारागृहात नेत असताना दोन फॉर्च्यूनर आणि एका थार गाडीतून गजा मारणेच्या सहकाऱ्यांनी पोलिसांच्या गाडीचा पाठलाग केला. त्यानंतर ढाब्यावर गाडी थांबल्यानंतर सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ आणि बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते या तिघांनी त्याला पोलीस व्हॅनमध्ये जेवण दिले. त्यामुळे पोलिसांनी या तिघांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आलं. तर यातील बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते याला पोलिसांनी अटक केली. त्यानंतर न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील चौकशीत काय धक्कादायक माहिती पुढे येते ते पाहणार आता महत्त्वाचं असणार आहे.

MAHAD VINHERE NEWS;महाड विन्हेरे गावाजवळ भीषण अपघात; अपघातात एकाचा मृत्यू तर 8 जण जखमी

CHAKAN NEWS: पाठलाग केला, तोंड दाबलं, पडीक ठिकाणी नेलं अन्… पुण्यात महिलेबरोबर नराधमाचं राक्षसी कृत्य

Share This News
error: Content is protected !!