GAJA MARNE MUTTON PARTY पुण्यातील कुख्यात गुन्हेगार गजा मारणे उर्फ महाराज… हा नेहमीच काही ना काही कारणाने चर्चेत असतो. त्यातच आता पोलीस कोठडीत असलेल्या गजा मारणेला पोलिसांनीच व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्याचं उघड झालंय. गजा मारणेनं पोलीस व्हॅनमध्ये बसून पोलिसांसमोरच मटन पार्टी केली. ज्यामुळे संबंधित सर्व पोलिसांना निलंबित केला गेलंय… तर गजा मारण्याच्या शूटर्स गुन्हा दाखल झालाय. पोलीस व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारं हे सर्व प्रकरण काय आहे पाहूया GAJA MARNE MUTTON PARTY
कोथरूड परिसरातील भाजपच्या एका कार्यकर्त्याला गाडीचा कट लागल्या प्रकरणी कुख्यात गुंड गजा मारणे टोळीतील पाच ते सहा गुंडांनी बेदम मारहाण केली. हे प्रकरण थेट केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचलं. पोलिसांनी लगेचच संबंधितांवर गुन्हा दाखल केला. त्यांना अटकही केली. मात्र गुन्हा घडण्याच्या काही वेळ आधीच ही संपूर्ण टोळी आणि टोळीचा प्रमुख गजा मारणे यांनी जवळच असलेल्या थिएटर मध्ये सिनेमा बघितला होता. म्हणून परतत असतानाच ही घटना घडल्याने आणि या प्रकरणातील मुख्य आरोपींना मारहाण करण्यासाठी प्रोत्साहित केल्याप्रकरणी गजा मारणेवरही गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला अटक ही झाली. काही दिवसातच या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाईही करण्यात आली. सुरुवातीचे काही दिवस गजा मारणेचा मुक्काम हा पुण्यातील येरवडा कारागृहात होता. मात्र येरवडातील इतर कैद्यांमध्ये गजा मारणेचं असलेलं वर्चस्व आणि आकर्षण यातूनच त्याला बाहेर हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.GAJA MARNE MUTTON PARTY
त्यानुसार त्याला सांगली कारागृहात हलवण्यात आलं. मात्र येरवडाहून सांगलीला जाताना रस्त्यात घडली गजा मारणे आणि पोलिसांची जंगी मटन पार्टी… आणि याच पार्टीने स्वतः पोलीस आयुक्तांनाही आश्चर्यचकित केलं.मूळचा पुण्याचा असल्याने गजा मारणे पुणे शहरातील आणि येरवडा कारागृहातील अनेक गुन्हेगारांसाठी आकर्षण आहे. त्यामुळेच त्यांच्यासारख्या कुख्यात गुंडाला जेव्हा एखाद्या कारागृहात ठेवलं जातं त्यावेळी इतर लहान-मोठे गुन्हे करून आलेल्या कैद्यांसाठी तो आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. त्यावेळी अनेक कैदी त्याच्या जवळ जाण्याचा, त्याच्याशी ओळख वाढवण्याचा आणि अनेकदा त्याच्या टोळीत सामील होण्याचा प्रयत्न करतात. तर काही वेळा दुसऱ्या एखाद्या टोळीतील सदस्य असलेल्या कैद्यांमध्येही वर्चस्वावरून वाद होतात. जबर हाणामाऱ्या होतात. त्यामुळेच राज्यातील सर्वात मोठ्या कारागृहांपैकी एक असलेल्या आणि गजा मारणेनं अनेकदा शिक्षा भोगलेल्या येरवडा कारागृहातून त्याला सांगली कारागृहात पाठवण्याचा निर्णय झाला.गजा मारणेला पोलीस व्हॅन मधून सांगली कारागृहात नेण्यात येत असल्याची खबर त्याच्या टोळीतील तरुणांना मिळाली. ज्या पोलीस व्हॅन मधून त्याला नेलं जात होतं त्या व्हॅनचा दोन फॉर्च्यूनर आणि एका थार गाडीतून गजा मारणेच्या साथीदारांनी पाठलाग केला. त्यानंतर या सर्व गाड्या वाटेत असलेल्या ‘कणसे ढाब्यावर’ थांबल्या. तिथे थांबल्यानंतर सतीश शिळीमकर, विशाल धुमाळ आणि बाळकृष्ण उर्फ पांड्या मोहिते नावाच्या तरुणांनी गजा मारणेला पोलीस व्हॅनमध्येच जेवण दिलं आणि हा बेत होता मटणाचा…. हा सर्व प्रकार ढाब्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. आणि याची माहिती मिळाली थेट पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना… पोलीस आयुक्तांनी लागलीच या प्रकरणात पाच पोलीस कर्मचाऱ्यांना फैलावर घेतलं.
आणि कुख्यात गुंडाला व्हीआयपी ट्रीटमेंट दिल्या प्रकरणी तडका फडकी त्यांचं निलंबन ही करण्यात आलं. सहायक पोलिस निरीक्षक सुरज राजगुरु, पोलिस हवालदार महेश बामगुडे, सचिन मेमाणे, रमेश मेमाणे आणि पोलिस शिपाई राहुल परदेशी या पाच जणांवर हे कारवाई करण्यात आली.मिळालेल्या माहितीनुसार गजा मारणेसाठी मटणाचा बेत घेऊन आलेले तीनही जण गुंड आहेत.
यापैकी विशाल धुमाळ नावाच्या तरुणावर आधीच खुनाचा गुन्हा आहे. तर पांड्या मोहिते नावाचा गुंड हा सांगलीत गजा मारण्याच्या टोळीचा म्होरक्या म्हणून काम करत असल्याची माहिती ही समोर आली आहे. त्यामुळेच आता या प्रकरणातही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र ही सर्वच घटना समोर आल्यानंतर पुन्हा एकदा पोलीस प्रशासनावर सर्वसामान्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. कुख्यात गुंडांना जर भर रस्त्यात पोलिसांकडून मटन पार्टी करायला परवानगी दिली जात असेल तर बंद असलेल्या कारागृहात त्यांना किती व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असेल. आणि जर असंच असेल तर कुख्यात गुंडांना कारागृहात पाठवणं ही त्यांच्यासाठी खरंच शिक्षा आहे की एखादी व्हेकेशन आहे, असे प्रश्नही उपस्थित केले जात आहेत.
Jalna News | जालना जिल्हा हादरला; बाप लेकाची धारदार शस्त्राने भोसकून हत्या