गडचिरोली : गडचिरोलीमधून (Gadchiroli News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील घोट-मुलचेरा महामार्गांवर एका धावत्या बसने अचानक पेट घेतला. बसचालकाने प्रसंगावधान राखल्याने मोठा अनर्थ टळला आहे. ही खळबळजनक घटना आज 1 मार्चला सकाळच्या सुमारास गडचिरोली जिल्ह्यातील मुलचेरा ते घोट रस्त्यावर लागणाऱ्या जंगलात घडली. अचानक एसटीने पेट घेतल्याने प्रवाशांची भर जंगलात मोठी तारांबळ उडाली. या घटनेमध्ये सर्व प्रवासी सुखरूप असले तरी अचानक लागलेल्या या आगीच्या घटनेने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
एम एच-07 सी-9316 क्रमांकाची एसटी बस नेहमीप्रमाणे आज पहाटे 6 वाजता प्रवाश्यांना घेऊन गडचिरोलीकडे निघाली होती. दरम्यान, घोट पासून 3 किलोमीटर जंगलात बस आली असता बसने अचानक पेट घेतल्याचे बसचालकाच्या लक्षात आले. त्यानंतर बसचालकाने प्रसंगावधान राखात वेळीच बस थांबवून सर्व प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढले. यात जवळपास 8 प्रवासी आणि चालक-वाहक असल्याची माहिती पुढे आली असून हे सर्व या अपघातात थोडक्यात बचावले आहेत.
एसटी बसच्या इंजिनमधून अचानक धूर निघत असल्याने बसच्या बॅटरीमध्ये शॉर्ट सर्कीटने ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र बसचालक प्रदीप मडावी आणि वाहक लोकेश भांडेकर यांनी प्रसंगावधान साधून सर्व प्रवाश्यांना खाली उतरवले आणि स्वतःही इतर प्रवाश्यांचे सामान घेऊन खाली उतरले. त्यानंतर लगेच बसने पेट घेतला.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Navneet Kaur Rana : नवनीत राणांचं ठरलं ! लोकसभा निवडणूक ‘या’ पक्षाच्या चिन्हावर लढवणार
Pandharpur Blast : पंढरपूरमध्ये भीषण स्फोट; 1 किमी पर्यंतचा परिसर हादरला
Bengaluru Cafe Blast : बंगळुरू हादरलं ! कॅफेमध्ये भीषण स्फोट; 4 जण जखमी
Maratha Reservation : मराठा आरक्षणाविरोधात जयश्री पाटलांकडून हायकोर्टात याचिका दाखल
Buldhana News : शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडांवर ‘या’ प्रकरणी गुन्हा दाखल
Maratha Reservation : मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केली ‘ही’ नवी मागणी
Loksabha Election 2024: ‘मविआ’च्या 48 संभाव्य उमेदवारांची यादी आली समोर
Car Accident : केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन यांच्या ताफ्यातील कारचा भीषण अपघात
Weather Update : ‘या’ जिल्ह्यांत आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता
Setu Bandha Sarvangasana : सेतुबंधासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?