Solapur Accident

Solapur Accident : सोलापूरमध्ये भीषण अपघात; 4 जण जखमी

371 0

सोलापूर : सोलापूर – हैदराबाद महामार्गावर एक भीषण अपघात (Solapur Accident) झाला आहे. या अपघातात 4 जण जखमी झाले आहेत. सोलापुरातील कीर्ती गोल्ड ब्रम्हनाथ मंदिराच्यासमोर डंपरने ब्रेक मारल्यामुळे पाठिमागून येणाऱ्या कारचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये कार पलटी झाल्यानं चार जण जखमी झाले आहेत, सुदैवानं या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ही अपघातग्रस्त कार उमरग्याहून पुण्याकडे जाण्यासाठी निघाली होती, मात्र वाटेतच या कारचा भीषण अपघात झाला. या अपघातामुळे काही काळ महामार्गावर वाहतूककोंडी निर्माण झाली होती. यानंतर महामार्गावर पलटी झालेली ही कार क्रेनच्या मदतीनं बाजूला करण्यात आली आणि वाहतूक सुरळीत करण्यात आली. या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Share This News
error: Content is protected !!