अखेर….त्या व्हायरल पत्रावर कृष्णप्रकाश यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले….

1015 0

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलीस निरीक्षक डॉ. अशोक डोंगरे यांच्या नावाचा गैरवापर करून माझे पोलीस आयुक्त पदाच्या कारकिर्दीत आपल्याकडून चुकीची कामे करून घेतल्या बाबतचा तक्रारी अर्ज सोशल मीडियावर व्हायरल होत असून या व्हायरल पत्रावर कृष्णप्रकाश यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणतात हे पत्र खोटं असून आपल्या विरोधात काही व्यक्तींनी षडयंत्र केल्याचा आरोप केला आहे.

दुसरीकडे आरोप करण्यात आलेल्या पत्रावर ज्या पोलीस अधिकाऱ्याचं नाव आहे त्या अधिकाऱ्याने देखील आपलं नाव वापरून खोटी सही करून पोलीस विभागाची बदनामी केल्याची तक्रार पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

 

या आरोपांवर बोलताना कृष्ण प्रकाश म्हणाले, “माझ्यावरील आरोप हे काही व्यक्तींनी केलेलं षडयंत्र आहे. मी चुकीचं काहीही केलेलं नाही. हे पत्र खोटं आहे. पत्र खोटं असल्याचं एपीआय अशोक डोंगरे यांनी देखील सांगितलं आहे. तशी तक्रार केली आहे.”

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!