Crime News

Crime News : 6 वर्षांच्या चिमुकलीसह बापाने स्वतःलादेखील संपवलं

488 0

लातूर : लातूरमध्ये एक धक्कादायक घटना (Crime News) घडली आहे. यामध्ये 35 वर्षीय बापाने 6 वर्षांच्या चिमुकलीसह स्वतःचे जीवन संपवले आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ उडाली आहे. त्याने आपल्या सहा वर्षांच्या चिमुकलीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केली. बुधवारी सकाळी दहा ते अकराच्या सुमारस ही घटना घडली.

काय घडले नेमके?
लातूर शहरातील अभय भूतडा यांचे 8 वर्षांपूर्वी एका मुलीशी लग्न झाले. त्या दोघांना 6 वर्षांची मुलगी आहे. अभय हे सध्या सासरवाडीतच रहायला होते. तसंच त्यांनी मोतीनगर भागात घर भाड्याने घेतलं होतं. अभय भूतडा हे मार्केट यार्ड परिसरात हॉटेल व्यवसाय करत होते. अभय भूतडा हे बुधवारी सकाळी मुलीला शाळेत सोडतो सांगून हॉटेलमधून निघाले होते. मुलीला शाळेत सोडल्यानंतर पुन्हा काही वेळाने मुलीला आणण्यासाठी गेले. वडील असल्याने शिक्षकांनीही मुलगी नव्याला त्यांच्याकडे सोपवले.

यानंतर अभय भूतडा हे सासरवाडीत न जाता मोतीनगर इथल्या भाड्याच्या घरी गेले. मुलीला इडली घेऊन देतो म्हणत डब्यात इडलीसुद्धा घेतली होती. मुलीसोबत घरी पोहोचल्यानंतर त्यांनी मुलीची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर स्वत:ही आत्महत्या केली. अभय भूतडा यांना त्यांच्या कुटुंबियांसह अनेकांनी आर्थिक मदत केली होती. त्यांनी वेगवेगळे व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना यश मिळालं नाही. हॉटेल व्यवसाय सुरू केला पण त्यातही म्हणावं तितकं उत्पन्न मिळत नव्हतं. ते कर्जबाजारी झाले होते. या टेन्शनमधून त्यांनी स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Parvatasana : पर्वतासन म्हणजे काय ? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!