Nagpur News

Nagpur News : नागपूरमध्ये एमआयडीसीत भीषण स्फोट; 6 जण जखमी

563 0

नागपूर : नागपूरमधून एक धक्कादायक (Nagpur News) घटना समोर आली आहे. यामध्ये जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसीत असलेल्या इंडोरामा कंपनीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. कंपनीच्या टँकची दुरुस्ती सुरू असताना हा स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये 6 जण जखमी झाले आहेत. या अपघातातील जखमी कामगारांना उपचारासाठी नागपुरातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

टँकमध्ये वेल्डिंगचं काम सुरू असताना गुरुवारी पहिला स्फोट झाला, त्याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. दरम्यान शुक्रवारी पुन्हा टँकमध्ये वेल्डिंगचं काम सुरू असताना स्फोट झाला, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. दोन्ही घटनेत मिळून एकूण ६ कामगार जखमी झाले आहेत. जखमी कामगारांवर नागपुरातील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पुन्हा एकदा कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Share This News
error: Content is protected !!