Crime

पोलिसांच्या हातावर तुरी देऊन निसटला; पोलिसांनी सापळा लावला आणि अखेर…..

2480 0

शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विनयभंग प्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या आरोपीला शिरुर पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यासाठी नेले असताना पोलिसाच्या हाताला हिसका देऊन बेडीसह पळून गेलेल्या धनराज मधुकर डोंगरे याला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने बीड जिल्ह्यातून नुकतेच ताब्यात घेतले आहे.

शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका महिलेचे अश्लील चित्रीकरण करत महिलेला दमदाटी केल्याने महिलेच्या तक्रारी वरून शिक्रापूर पोलिसांनी २४ मार्च रोजी धनराज मधुकर डोंगरे (वय ३०वर्षे) रा. चारदरी ता. धारूर जि. बीड याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली होती, २४ मार्च रोजी रात्री उशिरा शिक्रापूर पोलिसांनी धनराज डोंगरे याला शिरुर पोलीस स्टेशन च्या कोठडीत ठेवण्यासाठी नेले असता शिरुर पोलीस स्टेशनच्या आवारात पोलीस कर्मचाऱ्याच्या हाताला झटका मारून धनराज डोंगरे हा हातातील बेडीसह पळून गेला होता. त्यानंतर शिक्रापूर पोलिसांनी सापळा लावत आखेर डोंगरे ला बीड मधून अटक केली आहे.

Share This News
error: Content is protected !!