cng

Pune : दुचाकीत सीएनजी भरताना कर्मचाऱ्याचा निष्काळजीपणा भोवला; गमावावा लागला डोळा; व्हिडीओ आला समोर

292 0

पुणे : पुण्यातील धनकवडी परिसरतून धक्कादायक घटना समोर आली असून दुचाकीमध्ये सीएनजी भरत असताना गॅसचे नोझल अचानक उडाल्याने सीएनजी पंपावरील एका कर्मचाऱ्याला त्याचा डोळा कायमचा गमवावा लागला आहे. ही घटना तीन हत्ती चौकातील एस स्वेअर सीएनजी पंपावर घडली आहे.

या प्रकरणात पंप मालक धैर्यशील पानसरे आणि राहित हरकुर्ली यांच्याविरुद्ध सहकार नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेत हर्षद गणेश गेहलोत (रा. शंकर महाराज वसाहत) या कर्मचाऱ्याला त्याचा डोळा कायमचा गमवावा लागला आहे.

https://x.com/KasturiPawar12/status/1868912983184945557

 

या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये हर्षद गेहलोत सीएनजी पंपावर दिसत आहेत. त्यांनी एका दुचाकीमध्ये सीएनजी भरल्यानंतर गॅसचं नोझल जागेवर ठेवलं. पण काही सेकंदात ते नोझल त्यांच्या अंगावर उडाल्यामुळे त्याचा जोरात फटका चेहऱ्यावर बसल्यामुळे हर्षदच्या चेहऱ्यासह, डाव्या डोळ्यावरही लागलं गंभीर दुखापत झाली आहे. नोझल इतक्या प्रेशरमध्ये लागलं की हर्षद खाली कोसळून ते नोझल गोल-गोल फिरुन एका ठिकाणी पडले.
या घटने नंतर त्याला रुग्णालयात दाखल केल्यानंतर यात हर्षदचा डोळा निकामी झालाची बातमी समोर आली. या घटनेमुले परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Share This News
error: Content is protected !!