Dharashiv News

Dharashiv News : अधिकारी बनण्याचे स्वप्न राहिले अधुरं; सरावादरम्यान तरुणाच्या डोक्यात गोळा पडून दुर्दैवी मृत्यू

435 0

धाराशिव : धाराशिवमधून (Dharashiv News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये पोलीस भरतीची तयारी करीत असलेल्या तरुणाच्या डोक्यात गोळा पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे मृत तरुणाच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके?
मुस्तकीम जावेद काझी असे मृत तरुणाचे नाव आहे. तो आणि त्याचा मित्र काल बुधवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शहरातील तुळजाभवानी क्रीडा संकुलात गोळाफेकचा सराव करीत होते. हा सराव सुरू असतानाच फेकलेला गोळा मार्कींग करणाऱ्या मित्राच्या डोक्यात लागून तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत त्याला तातडीने जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

हे दोघे गोळाफेकचा सराव करण्यासाठी नियमितपणे श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलात येत असायते. नेहमीप्रमाणे बुधवारी रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास हे दोघे क्रीडा संकुलात दाखल झाले. लागलीच गोळा फेकण्याचा सराव सुरू केला. एकजण गोळा फेकण्याचा सराव करीत असताना दुसरा त्याची मार्कींग करीत होता. आलटून-पालटून हा सराव केला जात होता. गोळाफेकचा सराव झाल्यानंतर मुस्तकीम जावेद काझी हा तरूण मार्कींगसाठी पुढे गेला. याचवेळी मित्राने गोळा फेकल्याने तो मुस्तकीम जावेद काझी याच्या डोक्यात बसला आणि तो जखमी होऊन जमिनीवर कोसळला. यानंतर त्याच्या मित्राने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

T20 World Cup : भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर दहशतवादी हल्ल्याचं सावट; टीम इंडियाच्या सुरक्षेत वाढ

Jalgaon Crime : जळगाव हादरलं ! भुसावळमध्ये माजी नगरसेवकासह दोघांची गोळ्या झाडून हत्या

Share This News

Related Post

Nashik News

Nashik News : नाशिक हळहळलं ! दोन कर्त्या तरुणांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

Posted by - October 18, 2023 0
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील (Nashik News) सिन्नर तालुक्यात असलेल्या घोटी महामार्गावर हरसुले येथे ट्रक आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात सिन्नर तालुक्यातील…

प्रियांका चतुर्वेदी यांनी बाळासाहेबांचा व्हिडिओ शेअर करून दिले राज ठाकरे यांना प्रत्युत्तर

Posted by - May 5, 2022 0
मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगाबाद मधील सभेत मशिदींवरील भोंग्याबाबत आक्रमक घेतली. मशिदींवरील भोंगे उतरविण्यासाठी सरकारला ४…

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय, पाच तरुणींची सुटका तर एकाला अटक

Posted by - April 17, 2023 0
पुण्यातील वानवडी फातिमानगर परिसरात मसाज पार्लरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला. या कारवाईत…
Jalgaon News

Jalgaon News : जळगाव झालं सुन्न ! श्रावण सोमवारनिमित्त मंदिरात गेलेल्या एकाच कुटुंबातील 3 तरुणांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू

Posted by - August 22, 2023 0
जळगाव : जळगाव (Jalgaon News) जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातल्या (Jalgaon News) गिरणा व तापी नदीच्या संगमावर असलेल्या रामेश्वर महादेव मंदिरात श्रावण…
Pune News

Pune News : पुणे हादरलं ! दाजीची हत्या करून मेव्हण्याचीदेखील आत्महत्या

Posted by - September 13, 2023 0
पुणे : पुण्यातून (Pune News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये बहिणीला त्रास देत असल्याच्या कारणातून मेव्हण्याने आपल्या दाजीच्या…

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *