VALMIK KARAD CID : कराड इतके दिवस कुठे होता ? वाल्मीक कराडला सरेंडर होण्यासाठी घेऊन आलेल्या नगरसेवकांनी सांगितलं...

Valmik Karad ला झालेला Sleep Apnea आजार आहे तरी काय?

3227 0

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित आणि खंडणीच्या गुन्ह्यात कोठडीत असलेला आरोपी वाल्मीक कराडविषयी रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. आता नवीन काय, तर वाल्मीक कराड यानं त्याला Sleep Apnea नावाचा आजार असल्याचं म्हटलं आहे. या आजारासाठी त्याला ‘ऑटो सीपॅप’ नावाची मशीन वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असून ही मशीन चालवण्यासाठी कोठडीमध्ये 24 तास मदतनीस हवा असल्याची विनंतीच त्यानं केली आहे म्हणे! याबाबत त्यानं उच्च न्यायालयात याचिका दाखल केलीये. त्यामुळं आता हा Sleep Apnea आजार म्हणजे काय यावर चर्चा सुरू झालीये.

वाल्मीक कराडच्या निमित्तानं Sleep Apnea नावाचा आजार म्हणजे काय याची चर्चा सुरू झालीये. प्रसिद्ध संगीतकार बप्पी लाहिरी यांचा याच आजारामुळं मृत्यू झाला होता. वाल्मीक कराडला जडलेला हा Sleep Apnea म्हणजे आहे तरी काय?

अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर Sleep Apnea म्हणजे झोपेत असताना श्वसनक्रियेत होणारा अडथळा. ॲप्निया (Apnea) या ग्रीक शब्दाचा अर्थ आहे श्वास लागणं! झोपेत जीभ आणि जीभेमागचे काही स्नायू शिथील झाल्यानं जी स्थिती तयार होते तिला स्लीप ॲप्निया असं म्हणतात. प्रसिद्ध संगीतकार बप्पी लाहिरी यांचा याच Sleep Apnea नावाच्या आजारामुळं मृत्यू झाला होता. झोपेत घोरणं, विचित्र आवाज करणं ही या आजाराची सौम्य लक्षणं आहेत. पण, हाच आजार वाढला तर जागेपणी देखील त्याचे परिणाम त्रासदायक ठरू शकतात. जीभ आणि घशातले स्नायू प्रमाणाबाहेर शिथिल झाले तर श्वासनलिका कोंडते त्यामुळं मेंदूला ऑक्सिजनचा पुरवठा होण्यात अडथळा निर्माण होतो. त्यामुळं रक्तातली ऑक्सिजनची पातळीही कमी होते आणि मग जोरजोरानं श्वास घेतला जातो त्यालाच आपण घोरणं म्हणतो. पण, Sleep Apnea चा कालावधी वाढल्यास आणि त्यासोबतच वय जास्त असल्यास हृदय, रक्तदाब आणि मधुमेह यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळं हा आजार दुर्लक्ष करण्यासारखा मुळीच नाही, हे त्याच्या लक्षणांवरून दिसून येतं.

संशोधकांच्या मते, ज्या व्यक्ती लठ्ठ, वजनानं जास्त किंवा ज्यांच्या टॉनसिल्स लांब असतील अशा व्यक्तींना स्लीप ॲप्निया होण्याची शक्यता जास्त असते. 2019 मध्ये अमेरिकेत झालेल्या एका संशोधनानुसार, जगभरात काही अब्ज लोकांना सौम्य ते गंभीर स्वरुपाचा स्लीप ॲप्निया असतो. अमेरिकेतही 12% प्रौढ लोकांना हा आजार होतो. पण, यातले 80% लोक त्यावर उपचारही घेत नाहीत. श्वसनविकार तज्ज्ञांच्या मते, फुप्फुसाला होणारा ऑक्सिजन पुरवठा कमी झाल्यानं हा आजार होतो. झोपेत घोरणं हे त्याचं एक लक्षण आहे. हा त्रास वाढला तर मात्र रक्तदाब, मधुमेह आणि हृदयविकार अशी दुखणी पाठीमागं लागू शकतात. काही रूग्णांमध्ये नैराश्य आणि भीती दाटून येण्याचा प्रकारही घडतो, असंही तज्ज्ञांकडून सांगण्यात येतं.

Sleep Apnea आजारावर नियंत्रण ठेवण्यासाठी ‘ऑटो सीपॅप’ नावाची मशीन उपलब्ध आहे. वाल्मीक कराड यानं याच मशीनचा उल्लेख केला आहे. ‘ऑटो सीपॅप’ मशीन विशिष्ट दाबानं वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याचं त्यानं म्हटलं आहे. रोहित कांबळे यानं ही मशीन चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं असल्यानं त्याला आपल्या सोबत ठेवण्यात यावं, असंही त्यानं याचिकेत म्हटलंय. शिवाय ही मशीन चुकीच्या पध्दतीनं लावल्यास आपल्या जीवितास धोका होऊ शकतो, असा धक्कादायक दावाही त्यानं केलाय. वाल्मिक कराडच्या या दाव्यावर आता न्यायालय काय निर्णय घेणार हे महत्त्वाचं ठरणार असलं तरी वाल्मीक कराड यानं उल्लेख केलेल्या Sleep Apnea नावाच्या आजाराची आता सर्वत्र चर्चा सुरू झालीये हे नक्की!

Share This News
error: Content is protected !!