Divya Pahuja

Divya Pahuja : मॉडेल दिव्या पाहुजाचा 11 दिवसांनंतर सापडला मृतदेह; ‘त्या’ एका पुराव्याने उलगडलं हत्येचं गूढ

608 0

गुरुग्रमा : वृत्तसंस्था – मॉडेल दिव्या पाहुजा (Divya Pahuja) हत्या प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आली आहे. 10 दिवसांपासून दिव्या पाहुजाचा मृतदेह शोधण्याची मोहीम पोलिसांकडून सुरू होती. तिचा मृतदेह शोधण्यासाठी 6 टीम तैनात करण्यात आल्या होत्या. अखेर आज पोलिसांना मॉडेल दिव्या पाहुजाचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे. दिव्या पाहुजाचा मृतदेह हरियाणातील तोहाना कालव्यात आढळून आला आहे. पोलिसांनी कालव्यातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर त्याचा फोटो दिव्याच्या कुटुंबीयांना पाठवला, ते पाहून त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली आहे.

काय आहे नेमके प्रकरण?
2 जानेवारीला दिव्याची गुरुग्राममधील सिटी पॉइंट हॉटेलच्या रूम नंबर 111 मध्ये गोळ्या झाडून हत्या केली होती. हॉटेल मालक अभिजीत सिंग याने त्यांचे प्रायव्हेट फोटो डिलीट करण्यावरुन वाद घातला आणि त्यातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. मॉडेल दिव्या पाहुजा गँगस्टरच्या प्रेमात होती त्यानंतर त्याच्या हत्येप्रकरणी तुरुंगातून जाऊन आली होती. 2 जानेवारी रोजी तिची निर्घृण हत्या करुन मृतदेह लपवण्यात आला होता. याचा शोध पोलीस घेत होते. अखेर त्यांना मॉडेल दिव्या पाहुजाचा मृतदेह शोधण्यात आज यश आले.

दिव्या पाहुजा हत्याकांडातील मुख्य आरोपी अभिजीत सिंग याने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी त्याचा साथीदार बलराज गिल याच्याकडे दिली होती. त्याला या बदल्यात 10 लाख रुपये देखील देण्यात आले होते. दिव्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मृतदेहाचा शोध घेत असलेल्या पोलिसांना अखेर यश मिळालं. पोलिसांनी बलराजला कोलकाता विमानतळावरून अटक केली आहे. बलराज येथून परदेशात जाण्याच्या तयारीत होता. पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणी 6 जणांना अटक केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Sharad Mohol : …तर शरद मोहोळचा जीव वाचला असता; पोलीस चौकशीत ‘ही’ धक्कादायक माहिती आली समोर

Rakhi Sawant : बॉलिवूड अभिनेत्री राखी सावतंला कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक

Sharad Mohol : शरद मोहोळ हत्या प्रकरणात मोठी अपडेट ! आणखी ‘त्या’ 3 जणांना अटक; आतापर्यंत 13 जणांना अटक

Beed Accident : ट्रक-पिकअपचा भीषण अपघात; 5 जणांचा जागीच मृत्यू

Prabha Atre Passed Away : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!