Delhi Crime

Delhi Crime : भरधाव कारची पोलीस कर्मचाऱ्याला धडक; CCTV फुटेज आले समोर

483 0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नवी दिल्लीतून (Delhi Crime) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये एका भरधाव कारने पोलीस कर्मचाऱ्याला उडवले आहे. या भीषण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दिल्लीतील कॅनॉट प्लेस परिसरात ही अपघाताची घटना घडली आहे. गाडीने धडक दिल्याने पोलीस कर्मचारी हवेत फेकला गेला. या अपघातात पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

काय घडले नेमके?
पीडित पोलीस कर्मचारीआऊटर सर्कल येथे बॅरिकेड लावून वाहनांची तपासणी करत होता. त्याचदरम्यान, भरधाव वेगात आलेल्या एसयूव्हीने पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिली. त्यावेळी पोलीस कर्मचारी हवेत उडाला आणि बॅरिकेडवर पडला. त्यानंतर बॅरिकेडसह पोलीस कर्मचाऱ्याला चिरडत गाडीने पळ काढला. या अपघातानंतर पोलीस कर्मचाऱ्याल रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 24 ऑक्टोबर रोजी रात्री मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. रवी सिंह असे जखमी पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

काय आहे व्हिडिओमध्ये?
हवालदार रवी सिंह हे कॅनॉट प्लेसच्या आऊटर सर्कलवर वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी 52 वर्षीय आरोपी राम लखनने त्याच्या स्कॉर्पिओने हवालदार रवी सिंह यांना धडक देऊन पळ काढला. धडक बसताच रवी सिंह हवेत उडी उडाले आणि खाली पडून जखमी झाले. यानंतर तातडीने रवी सिंहला त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात दाखल केले. ही संपूर्ण अपघाताची घटना त्या ठिकाणी असलेल्या CCTV कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या अपघातानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!