DEHUROAD ATM NEWS: पिंपरी चिंचवडमधील देहूरोड परिसरात चोरट्याने मंगळवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला
परंतु नागरिकांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे पोलिसांना काही चोरट्यांना पकडण्यात यश आलं.DEHUROAD ATM NEWS
पिंपरी चिंचवड परिसरातील मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास एक खळबळजनक घटना घडली..मंगळवारी मध्यरात्री 2 वाजण्याच्या सुमारास 5 संशयितांनी चोरीच्या उद्देशाने एटीएम सेंटरमध्ये प्रवेश केला. त्यांनी गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न सुरू केला… मात्र हे सर्व करत असताना काही स्थानिकांना त्यांच्या हालचाली संशयास्पद जाणवल्या…
यानंतर स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना कळवली.. चोरांना याविषयी समजल्यानंतर त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला.
त्यावेळी पोलिसांनी दोन जणांना रंगेहात पकडलं..
त्यावेळी पोलीस आणि चोरट्यांमध्ये हाणामारी झाली..तेव्हा स्थानिक नागरिकांनी धैर्य दाखवत चोरांना पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं..
मात्र इतर तीन जण जवळच थांबलेल्या कारने पसार झाले..मुस्तफा मोबिन खान आणि मुस्तकीन मोबिन खान अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे असून हे दोघेही सख्खे भाऊ आहेत..
त्यांच्याकडून गॅस कटर आणि इतर साधने जप्त करण्यात आली आहेत..
पोलिसांनी या तपास सुरू केला असून, पळून गेलेल्या तिघांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.
देहूरोड परिसरात गेल्या काही महिन्यांत चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी गस्त वाढवण्याचे आश्वासन दिले आहे…
तर फरार आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत.
BEED NEWS: शिवराज दिवटेला मारहाण करणाऱ्या गुंडाचा आणखी एक कारनामा; अपहरण करून शेतकऱ्याला मारहाण