DAUND CRIME CASE: पुण्याच्या दौंडमध्ये (DAUND) एक खळबळजनक घटना घडली आहे.
एका तरुणाने आपल्या आईचे अनैतिक संबंध असल्याच्या
रागातून दुसऱ्या तरुणाचा निर्घृण खून केलाय.
SOLAPUR CRIME : माळशिरसमध्ये अनैतिक संबंधातून तरुणाला संपवलं | AKASH KURD PATIL #splapurnews
नेमकं हे प्रकरण काय आहे पाहूया…
दौंड शहरातील इंदिरानगर (DAUND CRIME CASE) परिसरात गुरुवारी रात्री पावणे बारा वाजता हा धक्कादायक प्रकार घडला.
प्रवीण दत्तात्रय पवार (PRAVIN DATTATRAY PAWAR) नावाच्या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आला.
विशाल उर्फ नण्या किसन थोरात असं या आरोपीचं नाव आहे.
विशालने प्रवीण पवार यांच्या डोक्यावर, तोंडावर आणि संपूर्ण शरीरावर धारदार कोयत्यानं वार केले.
या हल्ल्यात प्रवीण पवार यांचा जागीच मृत्यू झाला.
DHANANJAY MUNDE SATPUDA: धनंजय मुंडेंचा मुंबईत फ्लॅट सोडवेना ‘सातपुड्या’चा थाट !
दौंड पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला.
काही तासातच आरोपी विशाल याला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता या हत्येमागचं कारण स्पष्ट झालं.
आरोपी विशाल याच्या आईचे प्रवीण पवार याच्यासोबत अनैतिक संबंध होते.
त्याचाच राग विशालच्या डोक्यात होता. याच कारणावरून त्याने कोयत्याने वार करत पवारची हत्या केली.
दरम्यान आरोपी पोलिसांच्या कोठडीत असून अधिकचा तपासून सुरू आहे.
LATUR RAKSHABANDHAN SPECIAL: अपघातानंतर पत्नीनं साथ सोडली अन् बहिण भावाच्या मदतीला धावली
TOP NEWS MARATHI SPECIAL REPORT : शिंदेचे खासदार असलेल्या जागेवर भाजपाचा डोळा