Breaking News

गुंतवणुकीवर परताव्याच्या आमिषाने दोन कोटी ची फसवणूक करणाऱ्याला अटक

742 0

गुंतवणुकीवर परताव्याच्या आमिषाने 2 कोटी 93 लाख 66 हजार रुपयांची फसवणूक प्रकरणी क्रिप्टोबिझ कंपनीच्या संचालक राहुल विजय राठोड (वय ३५, रा. ब्लूरिच सोसायटी, हिंजवडी) व त्याचा साथीदार ओंकार दीपक सोनावणे (वय २५, रा. कोंढवा) यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत रवी शंकर पाटील यांनी फिर्याद दिली होती.

त्यांच्याकडून महागड्या मोटारीसह इलेक्ट्रॉनिक मुद्देमाल जप्त करण्यात आला असून प्राथमिक तपासात ४३ हून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.

ही कारवाई अर्थिक व सायबर गुन्हे शाखेचे (पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ निरीक्षक मिनल सुपे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले, सचिन जाधव, संदीप कदम , पोलीस अंमलदार संतोष जाधव, नवनाथ कोंडे, प्रविण राजपुत, बापु लोणकर यांच्यासह पथकाने केली.

Share This News
error: Content is protected !!