Crime

शहरात दुचाकीस्वार चोरटयांचा धुमाकूळ एकाच रात्री सात ठिकाणी नागरिकांना लुटले

495 0

पुणे- पुणे शहरात मागील काही दिवसांपासून दुचाकीस्वार चोरटयांनी धुमाकूळ घातला असून पोलीस या चोरट्याना पकडण्यात अपयशी ठरले आहेत. एकाच दिवसात चोरटयांनी वेगवेगळ्या ठिकाणी सात नागरिकांना लुटले आहे. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे. पोलीस रेकॉर्डवरील हे गुन्हेगार पोलिसांना का असा प्रश्न विचारला जात आहे.

सर्वाधिक घटना या हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्या आहेत .चंदननगर भागात ५ मे रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास २५ वर्षीय अजय खत्री हा तरूण गेरा कॉमर झोन कंपनीसमोरून फोनवर बोलत जात असताना पाठिमागून भरधाव दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्याच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला.

त्यानंतर सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास खराडी येथे विनय दोडकर ( वय ३४ ) हे आपल्या सोसायटीसमोर शतपावली करत असताना दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या हातातील ३० हजार रुपयांचा फोन जबरदस्तीने हिसकावून नेला. याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पुणे – सोलापूर रस्त्यावरील मिडोरी वाईन शॉपी येथे रात्री साडेअकरा वाजण्याच्या सुमारास बसची वाट पाहत थांबलेल्या २३ वर्षीय रोहित कसबे या तरुणाच्या गळ्याला चाकू लावून त्याच्याकडील चांदीची चेन व हातातील मोवाईल दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जबरदस्तीने नेला तसेच त्याच्या छातीवर चाकूने मारले. . रात्री अकराच्या सुमारास याच रस्त्याने पायी चालत जाणारे संजय चव्हाण ( वय ४६ ) यांच्या दंडात चाकू भोसकून त्यांच्याकडील पाकिटातून ५०० रुपयांची रोकड चोरून नेली.

साडे अकरा वाजण्याच्या सुमारास सोलापूर रस्त्यावरील बजाज शोरूमसमोर ट्रॅव्हल्सची वाट पाहत थांबलेल्या २१ वर्षीय अंकीत बेनवाड याला दुचाकीस्वार चोरट्यांनी चाकूचा धाक दाखवून लुटले. त्यानंतर गाडीतळ परिसरात रिक्षा चालकाला दुचाकीस्वार चोरट्यांनी शिवीगाळ करून व चाकूचा धाक दाखवून लुटले आहे. कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सव्वासात वाजण्याच्या सुमारास पादचारी २१ वर्षीय तरुणाचा मोबाईल या दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेला. याबाबत कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Share This News
error: Content is protected !!