पुण्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील डीआरडीओ विभागातील एका हवालदाराने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. हरेंद्र सिंह असे हवालदाराचे नाव असून त्यांनी आय एन एस शिवाजी या ठिकाणी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली. दरम्यान लोणावळ्या जवळ असलेल्या आणि संपूर्ण सुरक्षा असलेल्या आय एन एस शिवाजी या ठिकाणी हरेंद्र सिंह हे पिस्तूल घेऊन कसे गेले ? त्याचबरोबर त्यांनी आत्महत्या का केली ? याचा तपास सध्या पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू आहे. दरम्यान प्राथमिक चौकशीतून कौटुंबिक कारणामुळे त्यांनी आत्महत्या केली असावी, अशी माहिती समोर येत आहे. मात्र या आत्महत्यामुळे सैन्य दलात एकच खळबळ उडाली आहे.
