Chhatrapati Sambhajinagar News

Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगर हळहळलं ! खदानीत बुडून दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू

738 0

वाळूज महानगर : छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar News) एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये बजाजनगर येथील मोकळ्या मैदानात खड्ड्यातील पाण्यात पडल्याने बहिण भावाचा बुडून मृत्यू झाला आहे. चैताली राहुल देशमुख (वय 11), समर्थ राहुल देशमुख (वय 7, दोघेही रा. बजाजनगर, ता. छत्रपती संभाजीनगर) अशी बहीण भावाची नावे आहेत. या घटनेमुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय घडले नेमके?
विद्या राहुल देशमुख यांची मुले चैताली व समर्थ परिसरातील एका घरात चार ते पाच महिन्यापासून किरायाने राहतात. विद्या या एमआयडीसीत एका कंपनीत काम करतात. मुलगी चैताली चौथीत व समर्थ दुसरीत शिकत होते. हे दोघे बहीण-भाऊ शुक्रवारी दुपारी तीनला घराजवळील खदानीजवळ गेले. हा एमआयडीसीचा मोकळा भूखंड असून तेथून मुरुम उत्खनन केल्याने 10 ते 15 फूट मोठा खड्डा आहे. त्यात ड्रेनेज व पावसाचे पाणी साचले आहे. या ठिकाणी खेळत असलेले चैताली व समर्थ खड्ड्यात पडल्याने पाण्यात बुडाले. यावेळी शेजारीच खेळत असलेल्या राजवीर विकास साबर या आठ वर्षांच्या मुलाने आरडाओरडा केला. तसेच त्याने शेजारी असलेल्या एका तरुणाला घटनेची माहिती दिली.

यानंतर पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विशाल मोरे व गणेश खांडेकर यांनी खड्ड्यात उड्या मारून दोघांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. या दुर्घटनेत दोन सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Marathi Sahitya Sammelan : मराठी साहित्य संमेलनात ‘बालमेळावा’; चिमुकल्यांना मिळणार हक्काचं व्यासपीठ

Uddhav Thackeray : धारावीकरांना जिथल्या तिथे 500 स्क्वेअर फुटाचं घर द्या; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मागणी

Shocking Video : केरळमध्ये सुनेनी केली सासूला बेदम मारहाण; मुलगा मात्र…

IND vs ENG: टीम इंडियाच्या महिलांनी रचला इतिहास; पहिल्यांदाच केली ‘ही’ कामगिरी

Pune Accident : धान्य घेऊन जाणारा ट्रक कारवर कोसळून भीषण अपघात; 2 जण ठार

Allu Arjun : ‘पुष्पा’ फेम अल्लू अर्जुनने ‘ती’ जाहिरात नाकारत कोट्यवधींच्या ऑफर धुडकावली

Crime News : मैत्रीने केला घात ! चाकूच्या धाकाने आरोपींचा वस्तीगृहातील 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार

Ahmednagar Crime News : खळबळजनक ! अपहरण केलेल्या ‘त्या’ शेतकऱ्याचा आढळला मृतदेह

IND VS SA : वनडे आधी टीम इंडियाला दुसरा धक्का; शमीनंतर ‘हा’ खेळाडू बाहेर

Anup Ghoshal : बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक आणि संगीतकार अनुप घोषाल यांच निधन

Ahmednagar Suicide: खळबळजनक ! मनसे नगरसेवक वसंत मोरेंच्या नावानं चिठ्ठी तरुणाची आत्महत्या

Nagpur Accident : नागपुरात ट्रक आणि कारचा भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू

Ratan Tata : टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांना जीवे मारण्याची धमकी

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!